शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांच्या अर्जांची तपासणी, ना नोंदणी

By admin | Updated: June 20, 2017 01:03 IST

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारे अनुदान अडचणीत आले आहे.

आंतरजातीय विवाह योजनेत अनागोंदी : ३४.५० लाखांचा खर्च लेखापरीक्षणात अमान्य रूपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारे अनुदान अडचणीत आले आहे. समाजकल्याण विभागाच्यावतीने ६९ लाभार्थ्यांना ३४ लाख ५० रुपये वाटप केले आहे. मात्र हे अनुदान मंजूर करताना आलेल्या अर्जाची संबंधीत विभागाच्यावतीने कुठलीही तपासणी केली नाही शिवाय या अर्जाच्या कुठे नोंदीही नसल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. यामुळे या अनुदानाच्या खर्चाला घोळाचा गंध येत आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ कोणत्याही एका लाभार्थ्यांकडून दोन वेळा घेण्यात येवू नये याकरिता त्याने सादर केलेल्या प्रमाणपत्रावर रबरी शिक्का मारण्याचे आदेश आहेत. असे असताना लाभ देण्यात आलेल्या कोणत्याही लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर तसा शिक्का मारण्यात आला नसल्याचे उघड झाले आहे. यामुळे येथे एकाच प्रमाणपत्रावर किती जोडप्यांना लाभ देण्यात आला असावा याचा अंदाज बांधने अवघड होत आहे. या योजनेच्या माध्यमातून या विभागात चांगलाच आर्थिक घोळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या अर्जावर अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्या अर्जासोबत आवश्यक असलेला नमुना ‘क’ कोणत्याही अर्जासोबत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करण्याचा कालावधी एप्रिल ते सप्टेंबर असा असताना या काळात अर्ज सादर करण्यात आले नसल्याचे दिसून आले. जे अर्ज मंजूर करण्यात आले ते या काळाच्या नंतरच करण्यात आल्याचे दिसून आले आहे. हा सर्व घोळ लेखापरीक्षणातून समोर आला असून याची चौकशी होणे गरजेचे आहे. असे असताना विभागाच्यावतीने हा प्रकार नित्याचाच असून घेतलेले आक्षेप पूर्ण करण्याची संधी विभागाला मिळत असल्याने संबंधीत विभाग या बाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सायकल वाटपातही अनियमितता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर सायकल वाटपाचा कार्यक्रम समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतो. या कार्यक्रमालाही अनियमिततेची किनार असल्याचे दिसून आले आहे. येथे वेळापत्रकाचे पालन करण्यात आले नसल्याचे दिसून आले आहे. नियमानुसार ज्या कालावधीत सायकलंीची खरेदी व्हायला पाहिजे त्या काळात ती झाली नाही. शिवाय खरेदी करताना पुरवठादाराकडून आयकर विभागाचे प्रमाणपत्र घेण्यात आले नसल्याचे दिसून आले आहे. लाभार्थ्यांची निवड १ मे पर्यंत करावयाची असताना तसे झाले नाही. असे असताना वर्धेतील जैन ट्रेडर्स नामक व्यावसायिकाकडून ४८९ सायकली घेण्यात आल्या आहेत. या सर्व व्यवहारात अनागोंदी दिसत असल्याने १७ लाख ६१ हजार १३० रुपयांचा खर्चावर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या फंडातून राबविण्यात येत असलेल्या योजनांचे आॅडीट दर वर्षालाच होते. या काही नवीन नाही. लेखापरीक्षणात येणाऱ्या त्रुट्या या कुठल्या गोंधळामुळे नाही. असलेल्या त्रुट्या या गंभीर नाहीत. त्या कालांतराने दुरूस्त करण्याची संधी मिळते. यात असलेल्या त्रुट्या पूर्ण करण्यात येईल. - अविनाश रामटेके, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा. लेखापरिक्षणात पितळ उघडेसमाजातील मागासवर्गीयांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी समाजकल्याण विभागाकडे देण्यात आली आहे. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता हा विभाग गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. वैयक्तीक लाभाच्या योजना राबविताना विभागाकडून करण्यात आलेल्या अनागोंदीचे पितळ लेखापरीक्षण अहवालातून उघडे पडले आहे. हा अहवाल ‘लोकमत’च्या हाती आला असून या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्वच योजनात मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे दिसून आले आहे.