शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

स्वत:च्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्येकाने ‘नो व्हेईकल डे’ पाळावा!

By admin | Updated: December 22, 2015 02:58 IST

वर्धेकरांनी दर गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा केलेला निर्धार स्वागतार्ह आहे. प्रत्येक नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाच्या व

वर्धा : वर्धेकरांनी दर गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा केलेला निर्धार स्वागतार्ह आहे. प्रत्येक नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाच्या व शहराच्या आरोग्यासाठी हा दिवस नियमितपणे पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी वर्धेकरांना सोमवारी केले. या उपक्रमात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, अशी आशही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यावरण आणि वर्धेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘लोकमत’ने ‘नो व्हेईकल डे’साठी सातत्याने पाठपुरावा केला. रविवारी ३२ च्यावर संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी हा उपक्रम राबिवण्यासाठी प्रत्येक आठवड्याचा ‘गुरुवार’ या दिवसाची निवड केली. या उपक्रमाला वर्धेतील सर्व स्तरातून वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. जिल्हा प्रशासनानेही या उपक्रमात सहभागी व्हावे, याबाबतचा प्रस्ताव आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे आणि वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे यांनी आज जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समक्ष ठेवला. या प्रस्तावाचे तिनही अधिकाऱ्यांनी स्वागत करून ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे स्वागत करीत आपणही यंत्रणेसह या उपक्रमात सहभागी असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी आवश्यक ती मदतही करण्याचे ते म्हणाले. नागरिकांनीही हा उपक्रम आपल्यासाठी आहे हे गृहीत धरुन यामध्ये दर गुरुवारी सहभागी व्हावे, आणि हा दिवस साजरा करून वर्धेकरांनी इतरही जिल्ह्यांपुढे आदर्श ठेवावा, असे आवाहनही या अधिकाऱ्यांनी यावेळी केले.(जिल्हा प्रतिनिधी)