शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार यादीत नाव नोंदविणे गरजेचे

By admin | Updated: July 23, 2016 02:43 IST

ज्या व्यक्तींनी १ जानेवारी २०१६ ला वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत, अशा व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदविणे गरजेचे आहे.

मतदान जनजागृती अभियान : मेघना वासनकर यांची पत्रपरिषदेत माहिती पुलगाव : ज्या व्यक्तींनी १ जानेवारी २०१६ ला वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत, अशा व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदविणे गरजेचे आहे. पात्र व्यक्तींचे मतदार यादीत नाव नसेल त्यांनी ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत अर्ज करावे, नगर परिषदेची सार्वजनिक निवडणूक २०१६ मध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी पालिकेद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत केले. पालिकेच्या आगामी निवडणुकीत पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने नगर परिषदेद्वारे मतदान जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी पत्रकार परिषदेत घेण्यात आली होती. मतदार यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नाही. नागरिकांनी मतदार म्हणून नव्याने नाव नोंदविण्यासाठी नमुना क्रं. ६ मतदार यादीतून काही कारणास्तव आपले नाव वगळण्यात आले असल्यास नमुना क्रं.६ नव्याने भरावा. नमुना क्रं.७ मध्ये मतदार यादीतील नोंदीच्या ओळखपत्रातील नोंदीच्या तपशीलामध्ये दुरूस्ती करावयाची असल्यास व मतदार यादीतील नोंदीचे त्याच मतदार संघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करावयाचे असल्यास नमुना क्र. ८ अ मध्ये अर्ज भरून संबंधित तहसील कार्यालय किंवा संबंधीत केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करणे गरजेचे आहे. १९ वर्षांच्या वरील मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून ही जनजागृती मोहीम राबविली जात असल्याचे पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी सांगितले. संचालन सुभाष श्रीपतवार यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)