लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : मोजमाप न केल्याने भवानी वॉर्डातील नाली बांधकाम अतिक्रमण धारकांनी अडविले होते. यावर गुरूवारी मोजणी केल्याने बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.भवानी वॉर्डात मुख्य रस्त्याच्या कडेला नवीन नालीचे बांधकाम अतिक्रमण धारकांनी अडविले होते. मोजमाप केले नसल्याने भूमापन कार्यालयात अल्लीपूर ग्रा.पं. हद्दीतील भूखंड क्र. ८८ ते १८४ मधील ३० भूखंडांचे मोजमाप करण्यासाठी ५४ हजार रुपयांचा भरणा केला. १८ आॅगस्ट व १९ सप्टेंबर या तारखा मोजणीसाठी दिल्या होत्या; पण दोन्ही वेळा मोजणी रद्द झाली. यामुळे राजकीय दडपण येत असल्याने विलंब होत असल्याचा आरोप होत होता. अखेर २६ आॅक्टोबरचा मुहूर्त निघाला व मोजणी करण्यात आली. याबाबत ‘लोकमत’ वृत्त प्रकाशित केले होते. यावरून भूमापक अधिकारी सुरेश बंडवाल यांनी ग्रा.पं. ला भेट देत मत मांडले त्यानुसार मोजणीला सुरुवात करण्यात आली. कुठल्याही राजकीय दबावाशिवाय भूखंडांची मोजणी पूर्ण करण्यात आली.
अखेर भूखंड मोजणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:03 IST
मोजमाप न केल्याने भवानी वॉर्डातील नाली बांधकाम अतिक्रमण धारकांनी अडविले होते. यावर गुरूवारी मोजणी केल्याने बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
अखेर भूखंड मोजणीला प्रारंभ
ठळक मुद्देदोनदा तारीख रद्द झाल्याने होता संभ्रम