शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रोहणा बँक शाखा आर्वीला स्थानांतरित

By admin | Updated: January 1, 2017 02:05 IST

इमारत भाडे व प्रशासकीय खर्च वाचविण्याच्या नावाखाली जिल्हा मध्यवर्ती सहभागी बँकेच्या रोहणा शाखेचे स्थानांतरण आर्वी येथे करण्यात आले.

रोहणा : इमारत भाडे व प्रशासकीय खर्च वाचविण्याच्या नावाखाली जिल्हा मध्यवर्ती सहभागी बँकेच्या रोहणा शाखेचे स्थानांतरण आर्वी येथे करण्यात आले. सदर शाखा बंद झाल्याने ठेवीदार व खातेदारांना आर्वीला हेलपाटे मारावे लागणार आहे. कर्जधारक शेतकरी, व्यावसायिक व नोकरदार वर्गाला वसुलीपायी होणाऱ्या त्रासापासून थोडातरी दिलासा मिळणार आहे. २०१२ पासून आर्थिक डबघाईचा सामना करीत असलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बरेच चढउतार अनुभवले. परवाना रिझर्व्ह बँकेकडून पुनर्जीवित केल्यानंतर बँकेच्या व्यवहारात सुधारणा होईल, अशी अपेक्षा असताना व खातेदारांची १० टक्के रक्कम परत करणे सुरू असताना बँक प्रशासानाने खर्च वाचविण्यासाठी ग्रामीण शाखा शहरी शाखेत स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, ५० वर्षांची शेतकरी, शेतमजूर व गरिबांची बँक म्हणून नावारूपास आलेली येथील शाखा शनिवारपासून आर्वी शाखेत विलीन करण्यात आली. खातेदार व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधावर मात करीत शाखेचे विलीनीकरण झाले. यामुळे रोहणासह परिसरातील १६ गावांतील लाखाच्या वर खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले. आता आर्वीला चकरा मारण्याची वेळ खातेदारांवर आली. ठेवीदारांचीही चिंता वाढली आहे. एकंदरीत या स्थानांतरणामुळे रोहण्याच्या आर्थिक क्षेत्रात पोकळी निर्माण होणार असून सामान्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडणार आहे.(वार्ताहर)