शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

संविधान दिनी जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी संस्थेत कार्यक्रम

By admin | Updated: November 28, 2015 03:07 IST

संविधान दिली जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालय व विविध सामाजिक संस्थांच्यावतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला.

वर्धा : संविधान दिली जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालय व विविध सामाजिक संस्थांच्यावतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांकडून संविधानाचे वाचन करून घेण्यात आले. वायुपुत्र तंत्रशिक्षण प्रसारक मंडळ वर्धा : संविधान दिवसानिमित्त वायुपुत्र तंत्रशिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने वर्धा होमगार्ड मैदानावर संविधान प्रतिज्ञा वाचनाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा जिल्हा होमगार्डचे अधिकारी चंद्रकांत हिवरे, नगराळे, दुधे व जयस्वाल उपस्थित होते. एसडीपीओ वानखेडे यांनी संविधानाच्या अधिकाराचे महत्व विषद केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रसन्ना बोधनकर, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणार्थी, होमगार्ड कॅडेटस् व नागरिक उपस्थित होते. स्माईल पीपल्स बहुउद्देशीय संस्था वर्धा : स्माईल पीपल्स बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने भारताचे संविधान प्रास्ताविक वाचन करून संविधान दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संस्थेच्यावतीने उद्यानाची साफसफाई, प्लास्टिक निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत विनोद बंब, सुनील पिसे, अतुल गोलीवाले, भरत बंब, मिर्झा आसिफ अली, समीर शेख, शब्बीर शेख, सचिन माटे, आदित्य घडे, सुधीर भगत, दिनेश भगत, किशोर पाटील, सिद्धांत कांबळे, शैलेश सुखे, महेश गावंडे, रविकांत पाटील, सुनील शेंदरे, आक्षेप रामटेके, नितीन धारगावे, विलास येसनकर, अशोक शंभरकर, योगेश नगराळे, विजय मनवर, सोहेल शेख, आशिष बेले, धीरज कांबळे, गौरव मेश्राम, राहुल हावरे, प्रशील मेश्राम, किशोर खैरकार, बाबा जाकीर, मारोतराव जांभुरे, प्रतीक झामरे, श्रीकांत जांभुरे, आबीद आदी सहभागी होते. विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था वर्धा : महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात संविधान वाचन करून उपस्थितांनी शपथ घेतली. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष दामोधर सेलुकर, सचिव संतोष नागापुरे, कोषाध्यक्ष प्रेमसागर ताजणे, संचालक रवींद्र वानखेडे, सभासद गजानन पुनसे, संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश वरफडे, कॅशीअर प्रदीप कुबडे, लिपीक प्रशांत शिंदे, कृष्णा पाटील, अनिल कापसे, सुधीर मसकर, फुलचंद पाल इत्यादी उपस्थित होते. मॉडेल हायस्कूल रोहणा : मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य ए.एल. देशमुख हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एस.एच. दीक्षित, डी.के. अढावू, सोनी, मिसाळकर, काळे उपस्थित होते. नाखले, अढावू, दीक्षित यांनी संविधानाविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून देशमुख यांनी संविधानची व्यक्त केली. आस्था भंवरे, खुशबू ब्राह्मणे, मयूर रणनवरे, पल्लवी पारिसे हिने संविधान दिनावर विचार मांडले. संचालन श्रावणी आमझरे तर आभार आकांक्षा पाचेकर हिने मानले. गावातून ‘संविधान संदेश फेरी’ काढण्यात आली. कार्यक्रमाकरिता लवटे, राठोड, मडावी, शिरपूरकर, परमाल, डोर्लीकर, गेडाम, जाधव, शिंदे, रघाटाटे, नांदे, पांडे, कुंभरे व इतर शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विविध घोषणांनी कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. संविधानदिनी विविध संघटनांची रॅली वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लोक कनिष्ठ महाविद्यालय व तथागत विहार संस्था बौद्ध पंचायत समिती यांच्यासह वर्धा शहरातील विविध पुरोगामी व परिवर्तनवादी संघटनाच्या सहकार्याने सकाळी ९ वाजता शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी मोटर सायकल रॅली काढून संविधान दिन साजरा केला. रॅली शिवाजी चौक येथून निघून आर्वी नाका, बॅचलर रोड, इंदिरा मार्केट मार्ग सोशालिस्ट चौक, बजाज चौक ते इतवारा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप प्रास्ताविक वाचून करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे सुधीर गिऱ्हे, कामगार संयुक्त आघाडीचे गुणवंत डकरे, कास्ट्राईब संघटनेचे थुल, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, आयटकचे दिलीप उटाणे, बुद्धिष्ट रॉयल सोसायटीचे डॉ. सिद्धार्थ बुटले, स्माईल ग्रुपचे संदीप भगत, प्राध्यापक सोशल फोरमचे प्रा. सुधाकर सोनाने, तथागत विहार संस्थेच्या शारदा झामरे, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघटनेचे प्रा. श्रीरंग मेंढे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रकाश कांबळे, प्रास्ताविक गजेंद्र सुरकार, तर आभार अ‍ॅड. पुजा जाधव यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनील ढाले, भरत कोकावार, नरेंद्र कांबळे, राजाभाऊ वानखेडे, मंगेश शेंडे, अ‍ॅड. कपीलवृक्ष गोडघाटे, प्रा. माधुरी झाडे, धनंंजय कुटेमाटे, प्रशांत मेश्राम, राहुल हावरे, आशिष बेले, गौरव मेश्राम, अक्षय रामटेके, सचिन मुन, दिनेश वाणी यांनी परिश्रम घेतले. न्यू इंग्लिश हायस्कूल वर्धा : स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेच्या सर्व विभागात संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय व्यास तर अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक प्रकाश नगराळे, उपप्राचार्य अजय चतुर, बंडू दखणे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रफुल्ल लिंगावार यांनी केले. संचालन नम्रता गहिरवार, अपर्णा गौरशेट्टीवार यांनी केले तर आभार प्रशांत लिडबे, शरद घुलक्षे यांनी मानले. यशस्वीतेसाठी वासंती कुलकर्णी, राजकुमार काण्णव, अनघा आगवण, विजय जुगनाके, विणा उमरे, धनंजय कावटे, रत्नमाला कन्नाके, संजय शेगावकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. जिजामाता सबाने विद्यालय वर्धा : स्व. जिजामाता सबाने माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय म्हसाळा या शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. याच वेळी मुंबईतील आंतकवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अशोक झाडे तर प्रमुख अतिथी संस्थासचिव अतुल झाडे व प्राचार्य किशोर चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक विशाखा गिरी यांनी केले. श्रुती भोयर या दहावीच्या विद्यार्थ्यांद्वारे संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्याचप्रमाणे निबंध स्पर्धा घेण्यात आले. संचालन विनोद जांभुळे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. राजीव माध्यमिक विद्यालय देवळी : मुरदगाव येथील राजीव माध्यमिक विद्यालय, मुरदगाव (येसगाव) येथील कार्यक्रमात विद्यार्थ्यांनकडून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून घेण्यात आले. एस.एन. अढाऊ यांनी संविधानाबाबत मार्गदर्शन करून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर मुरदगाव, येसगाव या गावातून संविधान दिंडी काढण्यात आली. संविधान दिंडी शाळेच्या प्रांगणामध्ये परत आल्यानंतर मान्यवरांच्या मार्गदर्शनपर भाषणांचा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याधिकारी व्ही. बी. चौधरी, इंगोले, हटवार, अढाऊ उपस्थित होते. सम्यक बुद्ध विहार वर्धा : म्हसाळा येथील सम्यक बुद्ध विहार सांस्कृतिक भवन प्रबुद्ध नगर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागीरथी बोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून विहार समितीच्या अध्यक्ष वंदना पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी रेखा भानसे, कलावती बोरकर, सुनील ढाले, प्रेमलता रिंगणे, कान्होपात्रा वैद्य, शिला मून, चंदा उमरे, छाया गजभिये, विजार मयंकावर उपस्थित होत्या. भारताचा सर्वात मोठा ग्रंथ संविधान आहे, असे विचार सुनील ढाले यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहून देशावर उपकारच केले, असे विचार कलावती बोरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन हरिका ढाले यांनी केले तर आभार प्रियंका कांबळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुहानी ढाले, चंद्रकला निखाते, प्रतीक्षा नाईक, शीला मेश्राम, नम्रता भानसे, प्रियांश कांबळे, स्पर्शिका नाईक यांनी परिश्रम घेतले. विवेकानंद उच्च प्राथमिक शाळा वर्धा : स्थानिक रामनगर येथील विवेकानंद उच्च प्राथमिक शाळेमध्ये संविधान दिनी जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या पिंपळगावकर, शिक्षक व शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिकेने सर्व विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाबद्दल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. मॉडेल हायस्कूल वर्धा : मॉडेल हायस्कूल येथे भारतीय संविधानाचे वाचन करून त्याचा सविस्तर अर्थ आणि माहिती विद्यार्थ्यांना याप्रसंगी देण्यात आली. मुख्याध्यापक विजय मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या स्वरूपात अमूल्य मार्गदर्शन दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. पिपरी ग्रामपंचायत कार्यक्रम वर्धा : पिपरी (मेघे) ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संरपंच कुमुद लाजूरकर यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य अजय गौळकर यांच्यासह सचीव के.पी.बर्धिया यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. यशवंत विद्यालय, हिंगणी हिंगणी : स्थानिक यशवंत हायस्कूल येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अशोक गिरडे तर प्रमुख अतिथी म्हणून साखरे, ज्येष्ठ शिक्षक एस.एन. भगत, एन.एस. ठाकरे, मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन सामूहिक व वैयक्तिकरीत्या केले. मान्यवरांनी संविधान दिनाचे महत्व व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सी.एस. कांबळे यांनी केले तर आभार सी.व्ही. हिरूडकर यांनी मानले. बोधिसत्व विद्यालय अडेगाव वर्धा : येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनीष थुल होते. संविधान दिनानिमित्त गावांमधून प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून पुस्तकाचे वाचन करून घेतले. प्रास्ताविक जगदीश सहारे यांनी केले तर संविधान दिनानिमित्त धनंजय खोडे यांनी सविस्तर भाषण दिले. थुल यांनी अध्यक्षीय भाषणातून सविस्तर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संचालन राजेंद्र वडाळकर यांनी तर आभार रमेश डोंगरे यांनी केले. यशस्वीतेसाठी राजकुमार थुल, भारत भस्मे, मृणालिनी दातार, नरेश कोठेकार, राजकुमार कस्तुरे, नामदेव ठाकरे, दिलीप मडावी यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. इंदिरा हायस्कूल व विद्यालय भानखेडा : इंदिरा हायस्कूल येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मनोहर बारस्कर तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य किशोर चौधरी, सरपंच महेश देवढे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी योगिता निकुडे, आचल देवढे, नयन फुलमाळी, अनिरूद्ध थुल, वैष्णवी बगडे, समीक्षा राऊत, अक्षय वडतकर, भूषण मुंढरे, प्रतिक भोमले, राम कांबळे, तेजस्विनी आगे, कोमल वाढई, निकिता चौधरी इत्यादींनी भाग घेतला. दिव्या थुल, प्रतीक्षा बावणे, मंगेश चौधरी, सौरभ मस्कर, शिवानी सुकळकर यांनी भारतीय संविधान या विषयावर भाषणे दिली. भारतीय संविधान या विषयावर विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली. प्राचार्य बारस्कर यांनी संविधानाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विठ्ठल पाटील, दीपक कदम, रंजना बोधाने, साधना कोल्हे, भय्या डफ, शीला वरभे यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सुधीर कांबळे यांनी केले. संचालन पांडुरंग थुटे यांनी केले तर आभार नरेंद्र गलांडे यांनी मानले. यशस्वीतेकरिता प्रा. पवन आडे, प्रा. विद्या नागभिडकर, अतुल सोनटक्के, रामकृष्ण कामडी, मधुकर मोहिजे यांनी सहकार्य केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तलमले आय.टी.आय. वर्धा : तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीदरम्यान संस्थेच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी संविधान दिनाचे घोषणा फलक घेऊन, घोषणा देत जनजागृती अभियान राबविले. यानंतर सर्व निदेशक व प्रशिक्षणार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले व सामूहिकरीत्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. यशस्वीतेसाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. जनता शाळा देवळी : स्थानिक जनता हायस्कूल व ज्यू. कॉलेजमध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संध्या कापसे तर अतिथी म्हणून उपमुख्याध्यापिका वनिता मदनकर, पर्यवेक्षक बावणे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधान दिनाचे महत्व आपल्या गायनातून वाचनातून व भाषणातून विषद केले. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. संचालन रेखा आत्राम यांनी केले तर आभार कांचन घोडे यांनी मानले. डॉ. आंबेडकर विद्यालय वर्धा : भीमनगर येथील डॉ. आंबेडकर विद्यालयात शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद टापरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षिक एम.बी. धारणे उपस्थित होत्या. संचालन चेतन पडोळे यांनी केले तर आभार सुजाता भानसे यांनी मानले. कार्यक्रमाला मनोज धात्रक, सुनील बाभळे, वासंती हिवरे, प्रज्ञा कांबळे, शिबा शेख, सचिन फुलके, बबन सातघरे, शंकर रामदिनी, जनार्दन अडमाचे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)