शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोविड संकटातही अकरा महिन्यात वर्धा शहरातील मृत्यूसंख्या ‘इन कंट्रोल’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

सन २०१८ मध्ये एकूण ९६८ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नाेंद घेण्यात आली होती. त्यावर्षी मे महिन्यात तब्बल ११७ मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात तब्बल ८९ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे२०१९ मध्ये ९८३ मृत्यूंची नोंद : मे २०१८ मधील मृत्यूचा विक्रम कायम

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोरोना संकटाच्या काळात प्रत्येक व्यक्ती स्वत:ला कसे सुरक्षीत ठेवता येईल याचा विचार करीत त्यावर  प्रत्यक्ष कृती करीत असल्याने जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा ब्लास्ट झालेला नाही. इतकेच नव्हे तर २०२० या वर्षात प्रत्येक महिन्याला सरासरी ५० व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद स्थानिक स्वराज्य संस्था आलेल्या वर्धा नगरपालिकेच्या आणि जिल्हा रुग्णालयातील जन्म व मृत्यू विभागाने घेतली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या काळात या दोन्ही कार्यालयांनी शहरात ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेतली आहे. यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे ८९ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे मे २०१८ मध्ये तब्बल ११७ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची विक्रमी नोंद घेण्यात आली होती. परिणामी, कोरोना संकटाच्या काळातही शहरात मृत्यू संख्या नियंत्रणात असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी कोरोनाचे संकट मोठे आणि जीवघेणे असल्याचे वास्तव आहे.

यंदाच्या वर्षी सर्वाधिक मृत्यूसंख्या सप्टेंबरमध्येसन २०१८ मध्ये एकूण ९६८ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नाेंद घेण्यात आली होती. त्यावर्षी मे महिन्यात तब्बल ११७ मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात तब्बल ८९ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. 

वेळीच मिळताेय उपचारजिल्ह्यात दोन वैद्यकीय महाविद्यालय आहेत. ते विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. कोविड संकटाच्या काळात तेथे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत आहे. त्यामुळे मृत्यूदर नियंत्रणात आहे.- प्रवीण बोरकर, आराेग्य विभाग प्रमुख, न. प. वर्धा.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या