शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शीतदही होऊनही सोयाबीनचा पत्ता नाही

By admin | Updated: October 13, 2014 23:26 IST

यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दुबार तर कोणाला तिबार पेरणी करावी लागली या कारणाने बळीराजा पुरता बेजार झाला आहे. नेमक्या वेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन

वायगाव (नि.) : यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दुबार तर कोणाला तिबार पेरणी करावी लागली या कारणाने बळीराजा पुरता बेजार झाला आहे. नेमक्या वेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन एक महिना पुढे गेले. शीतदही आटोपून आता कापूस वेचायला सुरुवातही झाली आहे. पण अद्याप सोयाबीन हाते न आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यंदा पावसाने चांगलाच दगा दिल्याने खरीप हंगाम हिरावला गेला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या तर तोडचे पाणीच पळाले आहे. पण ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांची स्थितीही तितकीशी चांगली नाही. कारण सततच्या भारनियमनाने व्यवस्थित ओलितही त्यांना करता आलेले नाही. दरवर्षी दिवाळी आधी सोयाबीन चे उत्पन्न हाती येते. ते विकून शेतकऱ्यांना कशीबशी दिवाळी साजरी करता येत होती. कुठेकुठे शीतदही होऊन कापूस वेचण्याची तयारीही सुरू झाली आहे. पण सोयाबीनची सवंगणी मात्र सुरू झाली नसल्याने दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी नसल्याने पऱ्हाटीही करपत चालली आहे. सोयाबीन ला शेंगा फार कमी प्रमाणात लागल्या आहे. तसेच पिकावर रोगाने मारा केला आहे. दुबार-तिबार पेरणी नंतरही पीक हाती येणार की नाही या विवंचनेत आहे. खरीप हंगामाकरिता बळीराजाने केलेल्या उसनवारीचा व कर्जाचा डोंगर वाढतच जात आहे. सोयाबीनचे दाण्याचा आकार ज्वारीच्या दाण्याएवढा आहे. त्यामुळे उत्पादन झाले तरी ते किती होणार याचाही विचार शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. कापसाने तरी साथ देण्याची आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)