शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आदेशानंतरही मुद्रांक शुल्काची सक्ती कायम

By admin | Updated: April 14, 2017 02:16 IST

विद्यार्थी व नागरिकांना काही प्रमाणपत्रांसाठी मुद्रांक शुल्क महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांनी माफ केले;

अधिकाऱ्यांची हेकेखोरी : सामान्यांवर भुर्दंडरोहणा : विद्यार्थी व नागरिकांना काही प्रमाणपत्रांसाठी मुद्रांक शुल्क महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांनी माफ केले; पण तहसील, न्यायलये व शासकीय कार्यालयांत मुद्रांक शुल्क आकारणे सुरूच होते. यामुळे शासनाने पुन्हा सर्व कार्यालय प्रमुखांना मुद्रांक शुल्क न आकारण्याबाबत लेखी पत्रान्वये ९ मार्च रोजी अवगत केले. असे असताना मुद्रांक शुल्क आकारणी सुरूच आहे. राज्य शासनाने जात, उत्पन्न, वास्तव्य व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांच्यासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर लोकहितास्तव मुद्रांक शुल्क माफ केले आहे. ही बाब शासनाच्या महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबईने राज्यातील सर्व कार्यालय प्रमुखांच्या लक्षात आणून दिली. शिवाय मुद्रांक शुल्क घेऊ नये, असा आदेश दिला. यानंतरही उपरोक्त सर्व प्रमाणपत्र व प्रतिज्ञा पत्रांसाठी मुद्रांक शुल्क आकारणी अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांद्वारे चालूच राहिली. लोकप्रतिनिधी व जाणकारांमार्फत शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. शासकीय आदेशाचे प्रशासन उल्लंघन करीत आहे, हे सिद्ध झाल्यावर शासनाने पुन्हा शासकीय अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मुद्रांक शुल्क आकरू नये वा यासाठी स्टँम्पपेपर विकत घेण्याची सक्ती करू नये, असे कळविले आहे; पण या आदेशानंतर आता ७ वर्षे लोटली असताना मुद्रांक शुल्क आकारणी करणे अधिकाऱ्यांनी थांबविल्याचे दिसत नाही. जात, उत्पन्न, वास्तव्य व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तयार करताना विद्यार्थ्यांना १०० रुपयांचा स्टँम्पपेपर खरेदी करावा लागत आहे. शासकीय कार्यालयात व न्यायालयात कोणतेही प्रतिज्ञापत्र सादर करताना ते साध्या कागदावर स्वीकारण्याऐवजी १०० रुपयांच्या मुद्रांक पेपरवरच स्वीकारला जातो. एखाद्याने शासनाच्या या आदेशाची आठवण करून दिल्यास त्याला मुर्खात काढले जाते व त्याची अडवणूक करण्यात येते. विद्यार्थी व सामान्य नागरिकांची सर्रास आर्थिक लुट करण्याचा हा प्रकार मागील १३ वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. आम्ही कोणतेही परिपत्रक काढले तरी त्यात शासनाचे आर्थिक नुकसान होत असेल तर त्याची आपण अंमलबजावणी न करता वसुली सुरूच ठेवावी, असा गुप्त करार शासन व प्रशासनामध्ये झाला असावा, असा संशय सामान्यांकडून व्यक्त केला जात आहे. शिवाय शासनाच्या नियंत्रणात काम करणारे अधिकारी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही, अशी खात्री नागरिक व्यक्त करतात. शासनाने दुटप्पी धोरण सोडून अधिकाऱ्यांना मुद्रांक शुल्क आकारणी न करण्याबाबत कडक सूचना द्याव्या, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)