शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आदेशानंतरही ग्रामदूत केंद्र सुरूच

By admin | Updated: March 24, 2017 01:58 IST

आंजी (मोठी) येथील ग्रामदूत केंद्राविरोधात प्राप्त तक्रारीवरुन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन महा ई-सेवा केंद्र ब्लॉक करण्याचे आदेश दिले.

महा ई-सेवा केंद्र ब्लॉक करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशआकोली : आंजी (मोठी) येथील ग्रामदूत केंद्राविरोधात प्राप्त तक्रारीवरुन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन महा ई-सेवा केंद्र ब्लॉक करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतरही येथील केंद्र सुरूच आहे. याची दखल घेत कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रेशन कार्ड तयार करण्यासाठी दोनशे रूपयाची लाच मागितली, म्हणून विकास शंकर गोमासे यांनी ग्रामदुतचे किरण भावस्कर यांच्या विरोधात २५ जानेवारीला तक्रार दिली. जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारीची चौकशी करुन यात सत्यता आढळल्याने १५ मार्च २०१७ ला महा ई-सेवा केंद्र ब्लॉक करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. विकास गोमासे यांनी रेशन कार्ड नुतनीकरण करण्यासाठी दिले होते. नियमाप्रमाणे त्यांना ३३ रूपये खर्च लागत असताना भावरकर यांनी २०० रूपयांची मागणी केली होती. मागणी पूर्ण न केल्याने गोमासे यांचे रेशन कार्ड ग्रामदूतमध्ये अडकून पडले होते. या सर्व बाबींचे गोमासे यांनी छायाचित्रण करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी मे. एनएसपी फ्युचरटेकचे जिल्हा समन्वयक प्रतिक उमाटे यांना करण्याचे आदेश दिले होते. चौकशी अहवालातून आंजी (मोठी) येथील महा ई-सेवा केंद्र ब्लॉक करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले. युआयडी किट (लॅपटॉप, आयरीस स्कॅनर, थंबस्कॅनर, एलसीडी मॉनीटर, मल्टीफंक्शनल प्रिंटर, वेब कॅमेरा) कार्यालयाकडे सुपूर्द करण्याचे आदेशात नमुद आहे याची दखल घेण्याची मागणी आहे.(वार्ताहर)