शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

कारवाईनंतरही प्लास्टिकचा विळखा कायमच

By admin | Updated: January 11, 2015 23:02 IST

न्यायालयाच्यावतीने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक थैल्या वापरण्यावर बंदी आणली आहे. या थैल्या वापरणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला देण्यात आले आहे.

पालिकेचे धाडसत्र सुरूच : जनजागृतीकरिता पत्रक वाटपाची तयारी वर्धा : न्यायालयाच्यावतीने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक थैल्या वापरण्यावर बंदी आणली आहे. या थैल्या वापरणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला देण्यात आले आहे. यानुसार पालिकेच्यावतीने कारवाई सुरू आहे; मात्र शहरात या प्लास्टिक थैल्याचा वापर जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. रस्त्यारस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगात प्लास्टिकच्या थैल्या दिसत असल्याने शहराला प्लास्टिकचा विळखा कायमच आहे. पर्यापरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या प्लास्टिक थैल्यांच्या वापरावर न्यायालयाच्यावतीने बंदी आणण्यात आली. ५० मायक्रॉनच्या प्लास्टिक थैल्या नाल्यात वा पाणी वाहून नेणाऱ्या ठिकाणी अडकत असल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. यात न्यायालयाच्या निर्णयावरून शासनाच्यावतीने काढण्यात आलेल्या आदेशान्वये पालिकेच्यावतीने कारवाई सुरू आहे; मात्र नागरिकांकडून याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने नियम धाब्यावर बसवून नियमात नसलेल्या प्लास्टिक थैल्यांचा वापर सुरूच आहे. पालिकेच्यावतीने शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक थैल्या जप्त करण्याची मोहीम सुरू केली. यात व्यावसायिकाला दंडही ठोठावण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास ७०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर ५० च्यावर दुकानमालकांकडून ६० हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे. पालिकेडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत प्लास्टिक थैल्या जप्त करण्यासह दंड आकारण्यात येत असला तरी या प्लास्टिकच्या थैल्यांचा खच शहरातील कचऱ्यात दिसत आहे. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावताना प्लास्टिकच्या थैल्यांमुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यात नागरिकांनी बाजारात येताना कापडी पिशवी आणली तरी या थैल्यांचा वापर कमी होईल असे पालिकेचे म्हणणे आहे. शहरातील पान टपऱ्यांवरील पन्न्यांमुळे यात भर पडत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)