शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

ओबीसींच्या विकासासाठी जातीयनिहाय जनगणना गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धाच्यावतीने आयोजीत तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तराळे, शेखर शेंडे, प्रविण हिवरे, मिलिंद भेंडे, रविकांत बालपांडे यांची उपस्थिती होती

ठळक मुद्देरामदास तडस : तेली समाज उप वधू-वर व पालक परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील काही समाज घटक काही ऐतिहासिक कारणामुळे, इतर समाज घटकापासून सर्वच क्षेत्रात मागासलेले राहिले. ते जोपर्यंत इतर समाजाच्या बरोबरीस येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने समतेचे तत्वज्ञान प्रत्यक्षात येवू शकणार नाही. भारतीय संविधानकर्त्यांनी मागासलेल्या समाजघटकांना इतर समाज घटकाबरोबर बरोबरीने येण्यासाठी काही खास सवलती दिल्या. देशाची वाढत असलेली लोकसंख्या बघता निश्चितच ओबीसी समुहाची लोकसंख्याही त्याच वेगाने वाढत आहे. ओबीसी समुहाच्या जातीय जनगणनेचे अचूक आकडे उपलब्ध नसल्यामुळे ओबीसीचे आरक्षण कमी आहे. ओबीसींच्या विकासासाठी ओबीसींची जातीयनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धाच्यावतीने आयोजीत तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तराळे, शेखर शेंडे, प्रविण हिवरे, मिलिंद भेंडे, रविकांत बालपांडे यांची उपस्थिती होती. खा. तडस पुढे म्हणाले, समाज हा नविन विचारांचा आणि तरुणांचा योग्य समन्वय साधुन विकास करु शकतो. ओबीसींच्या समस्या निकाली निघाव्या म्हणून आपण जनगणनेचा विषय संसदेत मांडू असे आश्वास यावेळी त्यांनी दिले. कार्यक्रमादरम्यान सुरेश वाघमारे, माधव चंदनखेडे, गजानन टाके, अशोक लटारे, शेखर शेंडे, प्रविण हिवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्तावीक संस्थेचे सचिव हरिष हांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मोहन सायंकार यानी केले तर आभार शैलेंद्र झाडे यांनी मानले. यशस्वीतेकरिता अतुल पिसे, नितीन साटोणे, सुरेंद्र खोंड, पुष्पा डायगव्हाणे, किशोर गुजरकर, जगन्नाथ लाकडे, चंद्रकांत चामटकर, विनायक तेलरांधे, शोभा तडस, सुधीर चाफले, सचिन सुरकार आदींनी सहकार्य केले.उल्लेखनीय कार्य करणारे सन्मानितकार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचीत सभापती माधव चंदनखेडे तसेच जेष्ठ नागरिक नामदेव गुजरकर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच श्रृणानुबंध-२०२० या वधु-वर परिचय पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीRamdas Tadasरामदास तडस