शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार घरांमध्ये होणार गणरायाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:43 IST

राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जिल्ह्यातही गणेशोत्सवाची धूम असते. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

ठळक मुद्दे३०८ सार्वजनिक मंडळे : ९२ गावांत ‘एक गाव एक गणपती’

श्रेया केने।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जिल्ह्यातही गणेशोत्सवाची धूम असते. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात ११ हजार ६१९ घरांमध्ये श्रीगणेशाची स्थापना करण्यात येणार आहे. शुक्रवारी ही स्थापना होणार असून ३०८ सार्वजनिक गणेश मंडळे गणरायाची आराधना करणार आहेत. यातील ९२ गणेश मंडळांद्वारे ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविली जात आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांवरही बरीच बंधने लादली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी गणरायाच्या श्रद्धेपोटी भाविक सर्व सहन करून जल्लोषात आपल्या गणपतीची आराधना करणार आहे. यासाठी सर्व सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणेने पूर्वतयारी चालविली आहे. गणेशोत्सव काळात बंदोबस्ताकरिता ६०० पुरूष गृहरक्षक तैनात करण्यात येणार आहे. शिवाय राज्य राखीव दलाच्या १५० पोलीस कर्मचाºयांची एक कंपनी तैनात करण्यात येणार आहे. ११ हजार ६१९ घरांमध्ये गणरायाची आराधना केली जाणार असून त्यासाठी मूर्तीकारांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती बाजारात उपलब्ध करून दिल्याचे दिसते.मंदीच्या सावटात गणपतीच्या आगमनाची तयारीलाडक्या गणरायाच्या आगमनाची सर्व आतुरतेने वाट पाहतात. गणेशाच्या स्वागताची घरोघरी जय्यत तयारी केली जाते. गणरायाचे आगमण दोन दिवसांवर असून बाजारपेठेत मात्र त्याची चाहुल जाणवली नाही. नोटबंदी, पावसाचा लहरीपणा यामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था मोडकळीस आली. याचा परिणाम वस्तूंच्या विक्रीवर दिसतो. दरवर्षी लाखोच्या घरात होणारी विक्री यंदा ५० हजारांवरही पोहोचली नसल्याचे विक्रेते सांगतात. यामुळे मंदीच्या सावटात गणरायाचे आगमन होण्याची चिन्हे आहेत. बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली असून खरेदीसाठी ग्राहक नसल्याने उठाव नाही. फेरफटका मारला असता फारशी गर्दी नव्हती. ग्रामीण भागातून येणारे ग्राहक कमी झाल्याचे दिसले.चीनी वस्तूंचा शिरकाव कमीसण, उत्सव काळात बाजारपेठेत चीनी वस्तूंचा शिरकाव होतो; पण यंदा स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या वस्तूंचा समावेश असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. गौरी गणपतीकरिता लागणारे लाईटिंग वगळता सर्व वस्तू स्थानिक पातळीवर निर्मित आहेत. गणरायाची आरास करण्यासाठी तोरण, हार, लटी, आसन, टोप अशा विविध वस्तू विक्रीला आहे. कार्डबोर्डच्या रांगोळीला यंदा अधिक मागणी आहे.प्लास्टिक फुलांच्या तोरणाची चलतीगणपती, महालक्ष्मीकरिता लागणाºया फुलांच्या हारांची किंमत या काळात वधारते. सध्या प्लास्टिकच्या फुलांपासून निर्मित हारांची मागणी केली जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. प्लास्टिक फुलांचे हार दीर्घकाळ टिकतात. शिवाय ते दिसायला आकर्षक असतात. यंदा पावसाचा लंपडाव सुरू असल्याने फुलांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसून येते. फुलांची आवक घटल्याने किंमत वाढणार आहे.