शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात शिरलेल्या वन्यप्राण्यांना पर्यावरण बचाव समितीचा आश्रय

By admin | Updated: July 14, 2017 01:32 IST

शहरीकरणामुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. यामुळे वातावरणात बदल होत असल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात.

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शहरीकरणामुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. यामुळे वातावरणात बदल होत असल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात. यावर्षी प्रखर उन्हाळा संपून दीड महिना झाला. पाऊसही बऱ्यापैकी झाला आहे. असे असताना वन्यजीव मानवी वस्त्यांकडे धाव घेताना दिसतात. शहरात शिरणाऱ्या या वन्यप्राण्यांना पर्यावरण बचाव समितीने आश्रय दिला आहे. आर्वी येथे मागील पाच दिवसांत तीन जखमी हरीण मिळाले. त्यात एक भेडकी व दोन चितळ नामक हरिण होते. यातील भेडकी ही काकडधरा येथे कुत्र्यांनी जखमी केलेल्या अवस्थेत आढळली. समिती सदस्यांनी तिच्यावर उपचार करून पिपल फॉर अ‍ॅनिमल वर्धा येथे उपचाराकरिता पाठविले. एक चितळ हमालपुरा येथे जखमी अवस्थेत आढळले. ते पर्यावरण बचाव समितीच्या सदस्यांनी उपचार केले. त्याची परिस्थिती सुधारल्यावर आर्वी वनविभागाचे शिवाजी सावंत यांच्या निगराणीत सारंगपूरी येथे सोडले. दुसरे चितळ जनतानगर येथे जखमी अवस्थेत असल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांना कळविले होते. नागरिकांचे सहकार्य व वनविभागाच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्या चितळावर उपचार करण्यात आले; पण गंभीर जखमी असल्याने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही समिती वन्यप्राण्यांना जीवनदान देण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे.