लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संसर्गाचे निमित्त करुन जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांच्या कामांचा खोळंबा झाला, त्यामुळे महात्मा फुले समता परिषदेने याबाबत आवाज उठविला. कार्यालयाची दारे उघडला अन्यथा सत्याग्रह करण्याचा इशारा दिला. त्यांच्या मागणीला लोकमतनेही वृत्तांच्या माध्यमातून बळ दिल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयात तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालय, खनिकर्म विभाग यासह अनेक महत्त्वाची कार्यालये असल्याने नागरिकांची कामानिमित्त ये-जा सुरु आहे. पण, कोरोनाचे कारण करुन जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशव्दार सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले. काही तक्रारी व निवेदने असल्यास त्यांना प्रवेशव्दारावर नियुक्त कर्मचाऱ्यांकडे सोपवावी लागतात. या तक्रारी व निवेदन अद्यापही निकाली निघाल्या नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. त्यामुळे महात्मा फुले समता परिषदेचे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्वसामान्यांच्या कामाकरिता कार्यालयाचे दार उघडावे अन्यथा २० ऑगस्टपासून सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनाही निवेदन देऊन ही बाब लक्षात आणून दिली होती. या सर्व घडामोडीकडे लोकमतनेही लक्ष वेधले. परिणामी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याने महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी विभागीय अध्यक्ष प्रा.दिवाकर गमे, जिल्हाध्यक्ष निळकंठ पिसे, विनय डहाके, विशाल हजारे, निळकंठ राऊत, भारत चौधरी, वासुदेव ढुमने, विनोद पांडे, सुनील सावध, कवडुजी बुरंगे, नंदकिशोर काळपांडे, किशोर देवतारे व सुधीर चाफले उपस्थित होते.मिनीमंत्रालयात प्रवेश बंदीचजिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतही जवळपास १६ विभाग असून या ठिकाणी विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाºयांची संख्या मोठी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशबंदी केल्यानंतर जिल्हा परिषदेतही सर्वसामान्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आल्यापावलीच द्वारावरूनच परत जावे लागत आहे. मात्र, काहींचा विनाकारण जिल्हा परिषदेच्या इमारतीत वावर दिसून येतो. आता जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार उघडे केल्याने जिल्हा परिषेदेचे दार कधी उघडले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार अखेर उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतही जवळपास १६ विभाग असून या ठिकाणी विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाºयांची संख्या मोठी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशबंदी केल्यानंतर जिल्हा परिषदेतही सर्वसामान्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आल्यापावलीच द्वारावरूनच परत जावे लागत आहे. मात्र, काहींचा विनाकारण जिल्हा परिषदेच्या इमारतीत वावर दिसून येतो.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार अखेर उघडले
ठळक मुद्देलोकमतचा पाठपुरावा : महात्मा फुले समता परिषदेचा रेटा