शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकच्या अनिर्बंध वापराने पृथ्वी धोक्यात

By admin | Updated: January 12, 2017 00:30 IST

प्लास्टीकचा अनिर्बंध वापर मानवी जीवनास अतिशय घातक आहे. असे असताना सुद्धा आज प्रत्येकजण

मिलिंद पगारे : एन्व्हायर्नमेन्टल रिसर्च अ‍ॅण्ड कन्झर्वेशन सोसायटीचा जनजागृती उपक्रम सेलू : प्लास्टीकचा अनिर्बंध वापर मानवी जीवनास अतिशय घातक आहे. असे असताना सुद्धा आज प्रत्येकजण प्लास्टीकचा दैनंदिन वापर करीत असतो. त्यामुळे पर्यावरण परीसंस्था धोक्यात आल्या आहेत. माणसाने सतर्क होऊन याबद्दलच्या उपायांची कास धरून कृतिशील होणे आवश्यक आहे. अन्यथा मानव त्याच्या सर्वनाशास जबाबदार ठरू शकतो, असे प्रतिपादन प्लास्टिक निर्मूलन उपक्रमाचे नाशिक येथील कार्यकर्ते मिलिंद पगारे यांनी केले. स्थानिक यशवंत महाविद्यालयात एन्व्हार्मेंटल रिसर्च अ‍ॅण्ड कन्झर्वेशन सोसायटी इंडिया यांच्या स्टुडंट विंग तर्फे युवकांकरिता प्लास्टीकचा अनिर्बंध वापराचे दुष्पपरिणाम आणि उपाय यावर कार्यशाळा घेण्यात आली. यात प्रात्यक्षिकासह चित्रफितीद्वारे व्याख्यान झाले. पगारे यांनी युवकांसोबत संवाद साधला. प्राचार्य सतीश रघुवंशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर संघटनेचे अध्यक्ष व वन्यजीव युवा संशोधक पराग दांडगे, संयोजक प्रा. राजेश मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर उपस्थितांनी समायोचित मार्गदर्शन करताना प्लास्टिकच्या वापराने मानवाला कर्करोगाचा धोका असतो, असे सांगितले. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. राजेंद्र मुंढे यांनी कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक केले. महाविद्यालयातील विद्यार्थी गटाच्या कार्यातील उपक्रमाचे महत्व सांगून प्लास्टीक निर्मुलनासाठी त्यांच्या पूनर्वापराचे सुत्र सर्वांनी अवलंबावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला युवा वर्गाची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी उत्तरे देऊन शंकांचे समाधान केले.(तालुका प्रतिनिधी) प्रात्यक्षिकातून माहिती प्रात्यक्षिक चित्रफितीद्वारे प्लास्टीकच्या अनिर्बंध वापराची भयावहता स्पष्ट करताना प्लॉस्टीक कचऱ्याची विल्हेवाट हा निर्मुलनाचा उपाय नसून त्याचा पूनर्वावर करणे हाच या संकटातून सुटण्याचा मार्ग आहे, हे नमूद केले. याविषयी बोलून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. पॉलीथीनचा कमीतकमी वापर करून निसर्गातील अन्य जैविक घटकांना वाचविण्याचा प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.