शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण; मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:46 IST

नजीकच्या बेनोडा येथील घरकुल लाभार्थ्याने स्वमालकीची जागा सोडून शासकीय आणि रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत बांधकाम सुरू केलेले आहे. परिणामी रहदारीचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घरकुलाचे बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे व शासकीय आणि रहदारीच्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी अजय कडू यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आर्वी यांच्याकडे केली असून त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, वर्धा उपविभागीय अधिकारी, आर्वी, तहसीलदार, आर्वी व ठाणेदार आर्वी यांनाही पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देतातडीने काढण्याची मागणी : गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नजीकच्या बेनोडा येथील घरकुल लाभार्थ्याने स्वमालकीची जागा सोडून शासकीय आणि रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत बांधकाम सुरू केलेले आहे. परिणामी रहदारीचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घरकुलाचे बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे व शासकीय आणि रहदारीच्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी अजय कडू यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आर्वी यांच्याकडे केली असून त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, वर्धा उपविभागीय अधिकारी, आर्वी, तहसीलदार, आर्वी व ठाणेदार आर्वी यांनाही पाठविण्यात आले आहे.येथील घरकुल लाभार्थी बाबाराव मेश्राम व नीलेश बाबाराव मेश्राम यांनी घरकुल बांधकामासाठी स्वमालकीची जागा दाखविली; परंतु प्रत्यक्षात शासकीय व रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केलेले आहे. त्यामुळे रहदारीचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत आहे. ही बाब ग्रामसेविकेच्या निदर्शनास आणून दिली.त्यांनी घरकूल लाभार्थ्यास समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाभार्थी अरेरावी करीत आहे. शिवाय बांधकाम सुरूच ठेवले आहे. पावसाळा सुरू झाल्याने या रहदारीच्या रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यामुळे शाळेत जाणाºया लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून केव्हाही अपघात होऊ शकतो.ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, काही ग्रामपंचायत सदस्य अतिक्रमण करणाºया घरकुल लाभार्थ्याची पाठराखण करीत आहे. त्यामुळे प्रश्न सुटण्यापेक्षा वाद निर्माण होत आहे. अपघात घडल्यास ग्रामपंचायत सचिव, सरपंच व सदस्य जबाबदार असेल, असे ग्रामस्थ बोलत आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत शासकीय व रहदारीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी अजय कडू व गावकºयांनी केलेली आहे.घरकूल दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर बांधकाम करणाऱ्याला समज नोटीस दिल्यावरही त्याचे बांधकाम सुरू होते. अतिक्रमणधारक ऐकण्यास तयार नाही.मनोज परतेकी, सरपंच, माटोडा (बे.)रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्याने ग्रा.पं.च्या जागेवर घरकूल बांधण्याकरिता खड्डे खोदकाम करून पिल्लर उभारणीकरिता पिंजरे उभे केले आहे. त्याला काम करण्यास मनाई केल्यानंतरही काम सुरूच होते. पोलिसांत तक्रार केल्यानंतर काम बंद केले.दुर्गा चरडे, ग्रामसेविका, माटोडा (बे.)