शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

By admin | Updated: March 14, 2015 02:07 IST

शहरात पालिका व पोलीस विभागाच्यावतीने संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली.

वर्धा : शहरात पालिका व पोलीस विभागाच्यावतीने संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली. सकाळी बजाच चौक व आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने काढण्यात आली. बाजारातील दुकाने बंद असल्याने या भागात उद्या शनिवारी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पालिका व पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमुळे रहदारीस अडथळा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिकेकडे केल्या होत्या. शिवाय तशाच तक्रारी पोलीस विभागाकडेही करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत ही मोहीम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मोहीम राबविण्यापूर्वी पोलीस व पालिकेच्यावतीने या दुकानमालकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यांना या नोटीसात दुकान हटवून जागा मोकळी करण्याचे सांगण्यात आले होते; मात्र त्यांच्याकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. यामुळे आज ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती यावेळी नगर अभियंता सुधीर फरसोले व वाहतूक पोलीस निरीक्षक काळे यांनी दिली.अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पाडण्यात आलेल्या दुकानातील साहित्य जप्त करून त्यांना दंड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दंड आकारून हे साहित्य व्यावसायिकांना परत करण्यात येणार असल्याचही अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी बजाज चौकातील रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बजाज चौक व बसस्थानकासमोर कच्ची दुकाने तयार करून पोट भरणाऱ्यांवर शासनाच्यावतीने कारवाई करण्यात येते. बाजार परिसरात असलेल्या मोठ्या व्यवसायिकांवर शासनाच्यावतीने कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप अतिक्रमण काढण्यात आलेल्या व्यवसायिकांकडून करण्यात आला. यावर बाजार परिसरातील सर्वच अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी शहरातील मुख्य मार्गावर असलेले अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यात पालिकेकडून नियमांची अंमलबजावणी होते की केवळ छोट्या व्यवसायिकांवरच कारवाई करण्यात आली, याचा खुलासा होणार आहे. (प्रतिनिधी)