शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गावठाणच्या जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:57 IST

येथील बसस्थानक परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमणाने परिसीमा गाठली असतानाच आता गावातील गांधी वॉर्ड व नदी काठावरील रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले. यामुळे मलातपूर, गौरखेडा शिवारात जाणारा रस्ता अरुंद झाला आहे.

ठळक मुद्देरोहणा येथील प्रकार : ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : येथील बसस्थानक परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमणाने परिसीमा गाठली असतानाच आता गावातील गांधी वॉर्ड व नदी काठावरील रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले. यामुळे मलातपूर, गौरखेडा शिवारात जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. या अतिक्रमणाकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, महसूल विभाग व भूमापन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने अतिक्रमणधारकांचे फावले आहे.आपल्या घरासमोरील रस्ता व गावठाणची खाली जागा यावर आधी साध्या काड्या उभ्या करून त्यावर सावलीसाठी तुराट्या ठेवायच्या, नंतर हळूहळू लोखंडी खांब उभे केले. टिना टाकायच्या, काही साधने, पक्के बांधकाम करून आपला व्यवसाय उभा करायचा व कालांतराने ही जागा माझीच आहे, येथे २४ वर्षांपासून वास्तव्य असल्याने माझा हक्क आहे, अशी मानसिकता रोहण्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत असल्याने गावातील अनेक ठिकाणचे रस्ते पूर्वीच अरुंद झाले असताना आता गांधी वॉर्डातील आठवडी बाजार परिसरातील मलातपूर, गौरखेडा शिवारात जाणारा मोठा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. याच वॉर्डात एका खाली जागेवर एका व्यावसायिकाचा लाकडी ठेला आहे.त्या ठेल्यातून व्यावसायिक आपला व्यवसाय करतो. पण, दोन वर्षापूर्वी या जागेवर जागा मालकाने पक्के घर बांधले. त्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर व्यावसायिकाचा ठेला आहे. त्यामुळे घरमालक शेतकऱ्यांची रहदारी प्रभावित झाली आहे. हा ठेला दरवाज्यासमोरून उचलावा म्हणून घरमालकाने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. लोकशाही दिनात शिवाय महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडेही तक्रार नोंदविली आहे. ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने वाद समाझोत्यातून मिटावा म्हणून प्रयत्न केला. पण, दोन वर्षांपासून तिढा सुटू न झकल्याने घरमालकाचे शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविणे सुरूच आहे.अशा प्रकारे सुरूवातीला तात्पुरते व कालांतराने पक्के बांधकाम करून रस्त्यावर व गावठाणच्या जागेवर आपला हक्क सांगण्याच्या गावकरी व व्यावसायिकांच्या मानसिकतेमुळे रस्ते अरूंदच झाले नाही तर भांडणाचेही हे अतिक्रमण कारण ठरत आहे. तरी अतिक्रमण होता क्षणीच संबंधीत प्रशासनाने दखल घेतल्यास पुढील समया व वाद टाळता येतात एवढे मात्र खरे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण