शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांकडून शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 21:46 IST

निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला वेळीच देणे गरजेचे आहे. परंतु, बोरगाव (मेघे) येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांची टिसी देण्यासाठी अडवणूकच केली जात असल्याने संतप्त पालकांसह तेथील काही सुजान लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देबोरगाव (मेघे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला वेळीच देणे गरजेचे आहे. परंतु, बोरगाव (मेघे) येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांची टिसी देण्यासाठी अडवणूकच केली जात असल्याने संतप्त पालकांसह तेथील काही सुजान लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्र. ३ मध्ये जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. येथे लोमेश वऱ्हाडे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या शाळेचा निकाल ३० एप्रिलला जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शाळेने वेळीच शाळा सोडण्याचा दाखला देणे गरजेचे आहे. परंतु, पालकांना त्यांच्या पाल्याचा शाळा सोडल्याचा दाखलाच दिल्या जात नसल्याची तक्रार बोरगावचे विद्यमान सरपंच मोहन येरणे, नवनिर्वाचित सरपंच संतोष सेलूकर, महेश देवढे यांना प्राप्त झाली. त्यांनी पालकांची समस्या लक्षात घेता पालकांना सोबत घेऊन शाळा गाठली. अधिक विचारपूस दरम्यान एका विशिष्ट शाळेत जर विद्यार्थी पुढील शिक्षण घेणार असेल तर त्या विद्यार्थ्याच्या पाल्याला झटपट शाळा सोडल्याचा दाखला दिल्या जात होता. तर इतर पालकांना उद्या या, परवा या अशी उडवा-उडवीचीच उत्तरे दिली जात होती. हा संपूर्ण प्रकार बघितल्यावर पालकांसह सदर लोकप्रतिनिधींनी मुख्याध्यापक वऱ्हाडे यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची माहिती जि.प.च्या शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याला देण्यात आली. या घटनेमुळे शाळेतील शिक्षकांमध्ये एकच तारांबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी कारवाईची मागणी आहे.स्वच्छता कर्मचाºयाला मोबदला म्हणून दिले जाते तांदूळ आणि डाळग्रा.पं.च्या एक अस्थायी कर्मचाºयाकडून मुख्याध्यापक वºहाडे हे शाळेतील शौचालयाची स्वच्छता करून घेतात. या कर्मचाºयाला आर्थिक मोबदला देणे गरजेचे असताना त्याला चक्क विद्यार्थ्यांच्या वाटाचा असलेला तांदुळ व डाळ दिली जात असल्याचेही यावेळी येरणे, सेलूकर व देवढे तसेच पालकांच्या लक्षात आले. त्यामुळे येथील धान्यसाठ्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.पालकांना त्यांच्या पाल्याचा शाळा सोडल्याचा दाखला देणे सुरू आहे. शिवाय स्वच्छता कर्मचाºयाला तांदुळ व डाळ दिली जात नाही. शाळेचे विद्युत देयक शाळाच अदा करते. ते खिचडी शिजविणाऱ्यांकडून अदा करून घेतले जात नाही. माझ्यावर होणारे आरोप खोटे आहेत.- लोमेश वºहाडे, मुख्याध्यापक, जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, बोरगाव (मेघे).

टॅग्स :Schoolशाळा