शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारक धडकले जिल्हाकचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:45 IST

तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ६ हजार कुटुंबिय गत ३० वर्षांपासून विविध ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांना सदर जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी....

ठळक मुद्देस्थायी पट्टे देण्याची मागणी : युवा परिवर्तनचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ६ हजार कुटुंबिय गत ३० वर्षांपासून विविध ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांना सदर जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी बुधवारला युवा परिवर्तन की आवाज या संघटनेच्या नेतृत्त्वात झाशी राणी चौकातून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यावर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.मोर्चात संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने अतिक्रमणधारक सहभागी झाले होते. अतिक्रमण करून राहणाºया कुटुंबियांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमजुर, गवंडी बांधकाम कामगार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. हे व्यक्ती आपल्या कुटूंबाच्या निवाºयासाठी जमीन विकत घेऊ शकत नाहीत. सद्यस्थितीत त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून संसार थाटला आहे. सदर अतिक्रमण धारकांकडून दंडाच्या स्वरूपात रक्कम संबंधीत प्रशासन घेते. परंतु, त्यांना जमिनीचे स्थायी पट्टे न देण्यात आल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही.लोकप्रतिनिधींकडून या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. इतकेच नव्हे तर जिल्हा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तालुक्यातील २५ गावांमधील अतिक्रमण धारकांना राहत असलेल्या जागेचे स्थायी पट्टे देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या मागणीवर येत्या काही दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अतिक्रमण धारक आपल्या न्यायीक मागणीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.मोर्चाचे नेतृत्त्व निहाल पांडे, पलाश उमाटे, राहूल मिश्रा, गौरव वानखेडे, सुरज गायकवाड, शुभम मोकलकर, सौरभ माकोडे, अभिषेक बाळबुधे, साहिल नाडे, शुभम कुरील, ऋषभ मेंढुले, धरम शेंडे, सोनु दाते, अक्षय बाळसराफ व आदींनी केले. मोर्चात सावंगी(मेघे), पिपरी(मेघे), म्हसाळा, नालवाडी, गणेशपूर, पुलई, मांडवा, नागापुर, कुरझडी (जामठा), सेलसुरा, सिंदी(मेघे), पांढरकवडा, मांडवगड, वायगाव (नि.), पालोती, भुगाव, करंजी भोगे, सोनेगाव (स्टे.) येथील अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.