शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविले; साहित्य रस्त्यावरच

By admin | Updated: April 19, 2017 00:39 IST

वर्धा-आजनसरा मार्गावर असलेल्या या गावात मुख्य रस्त्यालगत अनेकांनी अतिक्रमण केले होते.

वाहतुकीची कोंडी : सामान्य नागरिकांनाही त्रास तळेगाव (टा.) : वर्धा-आजनसरा मार्गावर असलेल्या या गावात मुख्य रस्त्यालगत अनेकांनी अतिक्रमण केले होते. रस्ता निर्मितीकरिता बांधकाम विभागाकडून ते अतिक्रमण काढण्यात आले. या बाबीला महिना लोटत असताना मलबा हटविण्यात आला नाही. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून सांडपाण्याची व्यवस्थाही मोडकळीस आल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे. गावातील मुख्य मार्गावर काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने मोजमाप करीत काहींचे अतिक्रमण हटविले. उर्वरित अतिक्रमण दोन वर्षांपासून हटविण्यात आले नव्हते. काहींनी यादीत असताना घरे व दुकाने थाटली. परिणामी, प्रशासनाने पुन्हा मोजमाप करीत महिनाभरापूर्वी उर्वरित अतिक्रमणही तीन जेसीबीच्या साह्याने हटविले. मोठी घरे व दुकाने पाडली गेली. या मोहिमेस एक महिना लोटत असताना गावातील मलबा उचलण्यात आला नाही. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय सामान्यांनाही याला त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यालगत अनेक दुकाने असल्याने दुकानांसमोर विटा, माती, मोठे दगड जैसे थे पडून आहे. मंगहवारी याच मार्गावर झेंडा चौकाजवळ विद्युत कंपनीचा सिमेंट खांब टँकरची धडक लागल्याने कोसळला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यामुळे काही तास विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. पाडलेल्या इमारतींचे अवशेष शिल्लक असल्याने वाहने जाण्यासही जागा राहिली नाही. प्रशासनाने सदर मलबा उचलावा वा नालीचे खोदकाम करावे, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)