लोकमत न्यूज नेटवर्करसुलाबाद : येथील बसस्थानक परिसरात वर्धा रस्त्याच्या दोन्ही कडेला ३० ते ३५ बेरोजगारांनी पोटाची खळगी भरण्यासाठी दुकाने थाटली होती. हे अतिक्रमण पोलिसांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. ही कारवाई बांधकाम विभागाने पार पाडली. यामुळे पांदण रस्ता मोकळा झाला.रसुलाबाद शिवारात राठी व सातभाई परिवाराच्या शेताला लागून उपयोगात नसलेला पडिक पांदण रस्ता आहे. वर्धा रस्त्याच्या कडेला पांदण रस्त्याच्या मधोमध १०० वर्षांपूर्वीचे मोठे चिंचेचे झाड आहे. याच झाडाचा आधार घेत परिसरात हॉटेल व पानठेले लावून सातभाई परिवार शेतीपूरक व्यवसाय करीत होते. काही दिवसांपूर्वी पलीकडील शेत मालक कडू व इंगोले परिवारांनी त्यांच्या शेताच्या दक्षिण भागाला लागून असलेल्या नाल्याचे खोलीकरण व सिमेंट बंधाºयाचे काम सुरू असताना नाल्यातून परंपरागत एकमेव वहिवाट रस्ता असल्याचे सांगून शासनाकडून तीन ते चार लाख रुपये खर्चाचा सिमेंट पुल बांधून घेतला; पण या शेतकºयांनी पांदण रस्त्यावर हक्क दाखवित दावा पेश केला. त्याला अनुसरून बांधकाम विभागाने झाड कायम ठेवून दुकानांचे अतिक्रमण हटविले. पोलीस व अधिकाºयांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. दोन कुटुंबांचा वाद असल्याने गर्दी तथा तणाव निर्माण झाला होता.
रस्त्याच्या दुतर्फा केलेले अतिक्रमण बांधकाम विभागाने हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:35 IST
येथील बसस्थानक परिसरात वर्धा रस्त्याच्या दोन्ही कडेला ३० ते ३५ बेरोजगारांनी पोटाची खळगी भरण्यासाठी दुकाने थाटली होती. हे अतिक्रमण पोलिसांच्या उपस्थितीत हटविण्यात आले.
रस्त्याच्या दुतर्फा केलेले अतिक्रमण बांधकाम विभागाने हटविले
ठळक मुद्दे पांदण रस्ता मोकळा : पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई