शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या जागेवर शेकडो नागरिकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:38 IST

बोरगाव (मेघे) लगतच्या चितोडा मार्गावर वनविभागाच्या जागेवर नागरिकांनी अवैधरित्या अतिक्रमण केले आहे.

ठळक मुद्देमंत्र्यांकडे तक्रार : कारवाई होत नसल्याने नागरिकात असंतोष

आॅनलाईन लोकमतवर्धा : बोरगाव (मेघे) लगतच्या चितोडा मार्गावर वनविभागाच्या जागेवर नागरिकांनी अवैधरित्या अतिक्रमण केले आहे. मोठ्या प्रमाणात होत असताना वन अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. या अतिक्रमणामुळे चितोडा गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत राज्याचे वनमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात वनविभाग आता काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.बोरगाव (मेघे) ग्रा.पं. अंतर्गत चितोडा रस्त्यावर वनविभागाची जमीन आहे. या जमिनीवरील सर्व्हे क्र. ६५/१ व ६५/२, ६६, ७२, १८७ वर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत स्थानिक वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला अनेकदा नागरिकांनी माहिती दिली; पण कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण झाल्यास ते काढण्याचे अधिकार वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. ते पोलीस प्रशासनाची मदत घेत आपल्या जागा मोकळ्या करून घेऊ शकतात; पण बोरगाव येथील या प्रकरणाकडे वनविभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.या परिसराला भेट देऊन माहिती घेतली असता अनेक नागरिकांनी बांबूच्या ताट्या आणून येथे झोपड्या उभारण्याचे काम सुरू केले आहे. दररोज शेकडो नागरिक वन जमीन साफ करून तेथे आपली जागा राखून ठेवत आहेत. या सर्व अवैध प्रकाराकडे वनाधिकाºयांचे दुर्लक्ष आहे. यामुळे संतप्त झालेल्या चितोडा परिसरातील नागरिकांनी २ मार्च २०१७ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री, वनमंत्री व ग्रामीण विकास मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर वनविभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे आता ८ जानेवारी २०१८ रोजी पुन्हा ६० लोकांनी सामूहिकरित्या अतिक्रमण केले आहे. दररोज येथे जागेच्या वादातून नागरिकांमध्ये कलह निर्माण होत आहे. यामुळे या परिसरातील शांतता व सुव्यवस्थाही धोक्यात आली आहे. वनविभाग गप्प का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. बोरगाव (मेघे) ते चितोडा हा रस्ता या अतिक्रमणामुळे अत्यंत अरूंद झाला आहे. ८० फुटाचा रस्ता आता ८ फुट राहिला आहे. यामुळे चितोडा येथील नागरिकांना वहिवाटीलाही अडचण निर्माण झाली आहे. याकडे वनमंत्र्यांनी लक्ष देत अतिक्रमण हटवावे, अशी मागणी चितोडाच्या नागरिकांनी केली आहे.जागेच्या वादातून दररोज होतात भांडणेबोरगाव (मेघे) ते चितोडा मार्गावर अतिक्रमण करण्यात येत आहे. नागरिक दररोज आपल्या झोपड्या लावून जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी, आपसांतच त्यांचे भांडणे होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथील शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. हा प्रकार टाळण्याकरिता वन विभाग, महसूल विभाग तथा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवित सदर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे.चितोडा मार्गावरील अतिक्रमण सर्व्हे क्र. ६७ मध्ये झालेले आहे. सदर परिसराची पाहणी केली असून ती जागा महसूल विभागाची आहे. वन विभागाची जमीन नसल्याने आम्हाला कार्यवाही करता येत नाही. याबाबत वनमंत्री, उपवनसंरक्षक तथा जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना अहवाल पाठविला आहे.- एस.एस. बन्सोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, वर्धा.