शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगारातून होणार महिलांचे सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:35 IST

महिला ही किती जागरुकतेने व प्रभाविपणे आपली भुमिका व जबाबदाऱ्या पार पाडतात हे नेहमीच अनुभवाला मिळते. आज मेळाव्याच्या निमित्ताने ते स्पष्टही होत आहे.

ठळक मुद्देपंकज भोयर : एक दिवसीय विशेष मेळावा

आॅनलाईन लोकमतवर्धा : महिला ही किती जागरुकतेने व प्रभाविपणे आपली भुमिका व जबाबदाऱ्या पार पाडतात हे नेहमीच अनुभवाला मिळते. आज मेळाव्याच्या निमित्ताने ते स्पष्टही होत आहे. ग्रामीण भागातील महिलांनी गृहउद्योगाची कास धरली पाहिजे. स्वयंरोजगारातून महिलांचे सक्षमीकरण होऊ शकते, असे प्रतिपादन आ. डॉ. पंकज भोयर यांनी केले.जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, वर्धा व सेलू मार्फत ग्रामीण भागातील बेरोजगार महिला व किशोरींसाठी एक दिवसीय स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन स्थानिक शिववैभव सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, जि. प. सभापती सोनाली कलोडे, सभापती जयश्री गफाट, सभापती निता गजाम, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकुर, प्रकाश वाघ महाराज, डॉ. धनराज चौधरी, उज्वला सिरसाट, इमरान उलहक, अ‍ॅड. अनिता ठाकरे आदींची उपस्थिती होती.खा. रामदास तडस म्हणाले की, किशोरवयीन मुलींसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मुलींनी जास्तीत जास्त शिक्षण घेवून सक्षम बनले पाहिजे. तसेच मुलींनी स्पर्धा परीक्षेची तयारीही करावी. खºया अर्थाने महिला ही स्वावलंबी व सक्षम झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.सोनाली कलोडे यांनी ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाची आर्थिक स्थिती ही अत्यंत हलाखीची आहे. काम करणारे दोन हात अन् त्याच्या भरवश्यावर खाणारे जास्त असल्याने तेथील बालक व महिलांना पोषक आहार सुद्धा बहूदा मिळत नाही. अश्या महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठीच या प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील हिंगणघाट, देवळी व आर्वी विधासभा क्षेत्रातही अशाच प्रकारे मेळावे घेण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.