शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महिला कक्ष बंद होईल तो दिवस स्त्री सशक्तीकरणाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:44 IST

आज आपण २१ व्या शतकात आहोत. अनेक युगे बदलली. अनेक परिवर्तने व स्थित्यंतरे झालीत. परंतु भारतामध्ये आजही स्त्री-पुरूष समानता या विषयावर चर्चा करावी लागते.

ठळक मुद्देसना पंडीत : स्त्री-पुरुष समानता विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आज आपण २१ व्या शतकात आहोत. अनेक युगे बदलली. अनेक परिवर्तने व स्थित्यंतरे झालीत. परंतु भारतामध्ये आजही स्त्री-पुरूष समानता या विषयावर चर्चा करावी लागते. स्त्रीच्या अस्तित्वाचा, सक्षमीकरणाचा विचार करावा लागतो. ज्या दिवशी स्त्री-पुरुष हा भेद संपुष्टात येईल व अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबून महिला कक्ष बंद होतील तो दिवस खºया अर्थाने सशक्तीकरणाचा राहिल, असे प्रतिपादन नागपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक सना पंडित यांनी केले.स्थानिक लोक महाविद्यालयात महिला कक्ष, महिला अध्ययन व सेवा केंद्र तसेच महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोग वर्धा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्त्री-पुरूष समानता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रा. डॉ. गजानन कोटेवार तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश भोयर, प्राचार्य डॉ. विनाश साहुरकर, महिला कक्षाच्या प्रा.डॉ. सुचित्रा पाटणे, डॉ. सरिता गणराज आदींची उपस्थिती होती. .सना पंडित पुढे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आदी सक्षम स्त्रियांचे उदाहरण सध्याच्या स्त्रीने डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. कौटंूबिक हिंसाचारात भारत वरच्या क्रमांकावर आहे. स्त्रियांवर सतत अत्याचार होत आहेत. कुठे गेली स्त्री शक्ती? अजून किती अत्याचार आपण सहन करणार? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.भावनेच्या भरात स्त्री नको त्या गोष्टी करतात. राणी लक्ष्मीबाईने सैनिकांची फौज उभी केली होती. पण आपण स्त्रिया एकत्र येत नाहीत. समजाने सुद्धा स्त्रीला स्त्री चा खरा दर्जा न देता कायमची माता बनविली आहे. प्रत्येक स्त्रीने स्वत:चे व्यक्तिमत्व असे घडवा की, आपल्याला फॅशनची गरजच पडणार नाही. नकारही देता आला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला कक्ष प्रमुख डॉ. सुचित्रा पाटणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा ठाकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महिला लोक आयोगाच्या नंदिनी बर्वे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. सोनाली बन्सोड, प्रा. सुरकार, प्रा. सुनील पाटणे यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षणाच्या जोरावर स्त्रीने भरारी घ्यावी - कोटेवारशिक्षण हे महत्त्वाचे आहे. शिक्षणाअभावी महिला पूर्वी चुल आणि मुल पर्यंत सीमित होत्या. सध्या शिक्षणाचे दालन महिलांसाठीही उघडे आहे. विविध प्रकारचे शिक्षण घेऊन महिलांनी विविध क्षेत्रात भरारी घ्यावी, असे आवाहन डॉ. कोटेवार यांनी केले.