महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिला सर्वच स्तरात आपल्या कर्तृत्त्वाचा वेगळा ठसा उमटवत आहे. परंतु, याच कामादरम्यान स्त्रीया या आपल्या आरोग्यकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. महिलांचे निरोगी आरोग्य या उद्देशाने डॉ. अमरदीप भीमराव शानू यांच्याशी साधलेला संवाद...स्त्रीयांच्या आरोग्यावर मुख्यत: कुठल्या गोष्टींचा प्रभाव पडतो?स्त्रीयांच्या आरोग्यावर मुख्यत: आहार, राहणीमान, जीवनशैली याचा प्रभाव दिसून येतो. अयोग्य आहारामुळे पाळीच्याच नाही तर गर्भधारण समस्या आणि कर्करोगासारख्या समस्या उद्भवत आहेत. मद्यपान, धुम्रपान यामुळे स्त्री संप्रेरकावर आणि गर्भाशयांशी संबंधित आजार महिलांना जडत आहेत. शिवाय अंडाशय, गर्भाशय व स्तनांतील वाढत्या पेशींवर अतिशय विपरित परिणाम होऊन कर्करोगास निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे शिळे अन्न खाने, फ्रिजचा अतिरेकी वापर, फास्ट फुडचे अतिसेवन हे महिलांनी टाळले पाहिजे.महिलांनी निरोगी आरोग्यासाठी काय करावे?सध्याच्या धकाधमीच्या जीवनात महिलांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे. ताजे आणि घरचेच अन्न प्राधान्यक्रमाने महिलांनी सेवन केले पाहिजे. खाद्यपदार्थाची निवड करताना पॅकेटमधील खाद्यपदार्थाला पसंती देण्यापेक्षा नियमित फळांचे सेवन महिलांनी केले पाहिजे. मैदा, अतिक्षार व अतिसाखरेचा वापर टाळला पाहिजे.महिलांनी त्यांच्या राहणीमानात काय बदल करावा?शारिरीक व मानसिक तणावामुळे स्त्रीयांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, पाळीचे आजार संभावतात. त्यामुळे त्यांच्यात गर्भाशय व स्तनकर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. व्यायामाचा अभाव, निष्क्रिय व ताणतणावाची जीवनशैली प्रदुषण यामुळे अनेक आरोग्य विषयम समस्यांना महिलांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महिलांनी मानसिक व शारिरीक स्वास्थ सांभाने गरजेचे आहे. मानोरंजन व व्यायाम महिलांसाठी फायद्याचे ठरते, असे लोकमतशी बोलताना तज्ज्ञ डॉक्टर अमरदीप शानू यांनी सांगितले.
सशक्त स्त्री ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे -अमरदीप शानू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:44 IST
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिला सर्वच स्तरात आपल्या कर्तृत्त्वाचा वेगळा ठसा उमटवत आहे. परंतु, याच कामादरम्यान स्त्रीया या आपल्या आरोग्यकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. महिलांचे निरोगी आरोग्य या उद्देशाने डॉ. अमरदीप भीमराव शानू यांच्याशी साधलेला संवाद...
सशक्त स्त्री ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे -अमरदीप शानू
ठळक मुद्देव्यायाम आणि मनोरंजन ठरते फायद्याचेआरोग्य तज्ज्ञांशी थेट संवादसंडे स्पेशल मुलाखत