वर्धा : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित राष्ट्रवादी नोकरी महोत्सव मंगळवारी पार पडला़ शेकडो युवक-यवुतींची यशवंत महाविद्यालयात सकाळपासून लेखी परीक्षा देण्यासाठी गर्दी झाली होती. दहावी-बारावी पास नापास, आयटीआय, एससीव्हीसी, अर्धपदवीधर असे सर्व युवक-युवती नोकरी महोत्सवात सहभागी झाले. गतवर्षी १ हजार १३१ युवक-युवतींची पुणेच्या नामाकिंत कंपन्यांत निवड झाली होती. यावर्षी युवतींचा अधिक सहभाग होता. नोकरी महोत्सवाचे संयोजक समीर देशमुख यांनी प्रथम सहभागी युवक-युवतींसोबत संवाद साधत रोजागाराबाबत मार्गदर्शन केले. युवक-युवतींना रोजगाराची निकड लक्षात घेता नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील उद्योग हे सर्वांना रोजगार देण्यासाठी पर्याप्त नाहीत. त्यातच आयटीआय, एससीव्हीसी, अर्धपदवीधर अशा युवक-युवतींच्या रोजगाराचे काय, हा प्रश्न मोठा असल्याने त्यांनाही रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे, ते म्हणाले. परीक्षेची रूपरेषा सांगताना देशमुख म्हणाले की, सहभागी सर्व युवक-युवतींची प्रथम ५० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर वैयक्तिक मुलाखत घेऊन योग्य युवक व युवतींची निवड होईल. निवड झालेल्या युवक-युवतींना विद्यावेतन, पुढील शिक्षण याबाबत विस्तृत माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़ बेरोजगारांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने का होईना, काही प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न या माध्यमातून सुटत असेल तर आमच्यासाठी आनंदाची बाब असेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परीक्षा व मुलाखतीचे व्यवस्थित नियोजन रायुकाँ जिल्हाध्यक्ष संदीप किटे, शहराध्यक्ष अजीत ठाकरे, राविकाँ जिल्हाध्यक्ष राहुल घोडे, सेलू तालुकाध्यक्ष अर्चित निघडे, सागर टाके, प्रदीप डगवार, निलेश कसणारे, संदीप धुडे, मंगेश भोमले, किशोर झगडकर, प्रमोद खोडे, गोलू रोकडे, सुरज पोपटकर, मनोज डेकाटे, पवन राऊत, रवी संगतानी, बंटी पाल, गुरूदेव मसराम, मोहन हांडे आदींनी पार पाडले़(कार्यालय प्रतिनिधी)
नोकरी महोत्सवातून बेरोजगारांना रोजगार
By admin | Updated: July 1, 2014 23:39 IST