शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाचा तुघलकी कारभार

By admin | Updated: August 19, 2016 02:11 IST

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या तुघलकी कारभारामुळे पेन्शनधारक कामगारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राजपत्रानुसार आडनावातील बदल कार्यालयाला मान्य नाही देवळी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या तुघलकी कारभारामुळे पेन्शनधारक कामगारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाच्या राजपत्रानुसार कामगाराच्या आडनावात झालेला बदल या कार्यालयाला मान्य नाही. सुधारीत नावाने सेवानिवृत्ती वेतन देण्यास हे कार्यालय तयार नसल्याने येथील प्रभाकर चव्हाण यांची गत सहा महिन्यांपासून भटकंती सुरू आहे. कार्यालयाच्या या हेकेखोर धोरणामुळे चव्हाण यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग येथे प्रभाकर चव्हाण हे कामगार म्हणून कार्यरत होते. याठिकाणी काम करीत असताना त्यांच्या वेतनातून पीएफ कपात केला जात होता. आयुष्यातील २७ वर्षेपर्यंत सेवा दिल्यानंतर त्यांना लेबर अ‍ॅक्टनुसार २००९ पासून पेन्शन लागू झाली. तत्पूर्वी २००७ मध्ये त्यांनी आडनावात बंजारा समाजाचे रितीरिवाजानुसार बदल करून घेतला होता. त्यांचे आधीचे आडनाव पालथे होते; पण पालथे हे आडनाव कुटुंबीयांच्या दृष्टीने अडचणीचे ठरत होते. यामुळे त्यांनी आडनावात पालथे ऐवजी चव्हाण, असा बदल करून शासनाच्या राजपत्रात तशा प्रकारची नोंदही करून घेतली होती. राजपत्रात नावाची सुधारणा झाल्याची प्रत त्यांनी नागपूर येथील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात दिली. शिवाय चव्हाण या आडनावाची सुधारीत नोंद करून घेण्याची विनंतीही केली. त्यानुसार पीपीओ नंबर ७५११६ याप्रमाणे देवळीच्या स्टेट बँकेत प्रती महिना एक हजार याप्रमाणे पेन्शन जमा होऊ लागली. ही पेन्शन २००९ ते २०१५ च्या अखेरपर्यंत सुरळीत सुरू होती. यानंतर या कार्यालयाने एकाएकी पालथे आणि चव्हाण हे दोन वेगवेगळे व्यक्ती असल्याचा जावईशोध लावला. याच कारणातून चव्हाण यांच्या नावावरील पेन्शन बंद करण्यात आली. कार्यालयाच्या अज्ञानामुळे या कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)