शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांची ‘लेटलतिफी’

By admin | Updated: July 12, 2014 23:51 IST

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची लेटलतिफी नित्याचीच बाब झाली आहे़ शुक्रवारी सकाळी १० वाजून १० मिनीटांनी सेलू पंचायत समिती कार्यालयास भेट दिली असता कुणीही आढळून आले नाही़

घोराड : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची लेटलतिफी नित्याचीच बाब झाली आहे़ शुक्रवारी सकाळी १० वाजून १० मिनीटांनी सेलू पंचायत समिती कार्यालयास भेट दिली असता कुणीही आढळून आले नाही़ अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहण्याच्या शासनाच्या आदेशाला हरताळच फासत असल्याचे यातून दिसून आले़परिसरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात केवळ शिपाई उपस्थित होता़ पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालय, बांधकाम विभाग या कार्यालयाचे कुलूप उघडले होते; पण दार बंदच होते़ पंचायत समिती कार्यालयाच्या लेखा विभागात व पंचायत विभागात कुणीही उपस्थित नव्हते़ कृषी व आस्थापना विभागात तुरळक कर्मचारी उपस्थित होते़़ गटविकास अधिकारी उपस्थित नव्हते तर सहायक गटविकास अधिकारी उपस्थित होते़ यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची लेटलतिफी समोर आली़ शिक्षण व आरोग्य विस्तार अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य आढळून आली़ कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, असा आदेश असला तरी वर्र्धा येथूनच बहुतांश कर्मचारी ये-जा करतात़ पंचायत समिती परिसर हा विस्तीर्ण असताना येथे असलेली कर्मचाऱ्यांची निवासस्थाने पूर्णत: मोडकळीस आली आहेत़ काही निवासस्थानांवरून काही विभागाच्या कार्यालयाचा कारभार चालविला जात आहे़ सभापतीच्या निवासस्थानातून एका विभागाचा कारभार पाहिला जातो़ कर्मचारी उशीरा येत असल्याने नागरिकांना आपल्या कामांसाठी ताटकळावे लागते़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)