शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतरही कर्मचारी वेतनश्रेणीपासून वंचित

By admin | Updated: April 7, 2017 02:06 IST

नालवाडी येथील मूकबधीर विद्यालयात विशेष शिक्षक पदावर कार्यरत अशोक नागतोडे यांना १ एप्रिल २००० ते २४ जून २००१ या कालावधीत.....

टाळाटाळ : थकीत वेतनासाठी निव्वळ प्रतीक्षावर्धा : नालवाडी येथील मूकबधीर विद्यालयात विशेष शिक्षक पदावर कार्यरत अशोक नागतोडे यांना १ एप्रिल २००० ते २४ जून २००१ या कालावधीत विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त ठेवले होते. यामुळे त्यांनी संबंधित कालावधीची मान्यता व वेतन मिळावे म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर निकाल लागूनही त्यांना मान्यता व वेतन देण्यात आले नाही. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.नागतोडे यांच्या याचिकेवर नऊ वर्षांनी ९ जानेवारी रोजी न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती देशपांडे यांनी निर्वाळा दिला. यात प्रतिवादी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जि.प. समाज अधिकारी हे होते. यामुळे न्यायालयाने नागतोडे यांचे १ एप्रिल २००० ते २४ जून २००१ या कालावधीस सात्यत प्रदान करून सेवा नियमित करण्याचे आदेशात नमूद केले; पण न्यायालयाचा निकाल लागून दोन महिने लोटले असताना त्यांच्या उपरोक्त कालावधीच्या सेवेबाबत कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी, ते वरिष्ठ वेतनश्रेणीस पात्र असताना वंचित आहेत. १२ फेबु्रवारी २०११ पासून वरिष्ठ वेतनश्रेणी व त्यातील थकीत वेतन अद्याप मिळाले नाही. शिवाय १ जानेवारी १९९७ ते ३१ डिसेंबर २००५ या पाचव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनश्रेणीमधील वार्षिक वेतनवाढ फरकदेखील अद्याप देण्यात आलेला नाही. ही दोन्ही प्रकरणे केवळ न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण देत जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले. जि.प. समाज कल्याण अधिकाऱ्यांना न्यायालयाची प्रत देऊन त्वरित कार्यवाही करण्याची मागणी १० फेबु्रवारी रोजी नागतोडे यांनी निवेदनातून केली. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही ४, १४ आणि ३१ मार्च रोजी निवेदने दिली; पण जि.प. समाज कल्याण अधिकारी व वैद्यकीय सामाजिक कार्यकत्याच्या वेळकाढू व आडमुठे धोरणामुळे अद्याप न्यायालयाच्या आदेशावर अंमल करण्यात आला नाही. परिणामी, नागतोडे यांना आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)