शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेत कर्मचारी व नगरसेवक आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:23 IST

नगरपालिकेत मागील कित्येक दिवसांपासून अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांमधील धुसपूस सुरु होती. अखेर उपाध्यक्षांकडून नगररचनाकाराला झालेल्या मारहाणीनंतर हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने आता अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक आमने-सामने उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे कामबंद : नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगरपालिकेत मागील कित्येक दिवसांपासून अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांमधील धुसपूस सुरु होती. अखेर उपाध्यक्षांकडून नगररचनाकाराला झालेल्या मारहाणीनंतर हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने आता अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक आमने-सामने उभे ठाकले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले तर नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अधिकारी, कर्मचारी सन्मानजनक वागणूक देत नसल्याचा आरोप केला आहे.शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न फार गंभीर असून याच कारणावरुन गुरुवारी पालिकेत गदारोळ झाला. यात नगरचनाकार शंतनू देवईकर यांनी उपाध्यक्ष प्रदिपसिंग ठाकुर यांच्याविरुद्ध तर ठाकूर यांनी देवईकर यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या मारहाणीमुळे पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारुन कारवाईची मागणी केली आहे. तर उपाध्यक्ष ठाकूर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. नागरिकांनी समस्या सोडविण्याकरिता नगरसेवकांना निवडून दिले आहे. त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभागातील कामाविषयी सांगितले तर ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. तसेच हेके खोरीने वागून नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक देतात. असाच प्रकार गुरुवारी पालिकेत घडला. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर यांनी अधिकाºयांना अतिक्रमणाबाबत अहवाल मागितला असता सहाय्यक नगर रचनाकार यांनी उलटसूलट उत्तर देऊन उपाध्यक्षांशी अरेरावी केली. त्यानंतर लगेच शहर पोलीस स्टेशन गाठून उपाध्यक्षांविरुद्ध तक्रार नोंदवित कामबंद आंदोलन सुरु केले. हा नित्याचाच झाला आहे. त्यामुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांना सन्मानजनक वागणूक देऊन प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीचे वेळीच निराकरण करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. अपर जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन देताना उपाध्यक्ष ठाकूर, गटनेता निलेश खोंडे, सोनल ठाकरे, संदीप त्रिवेदी, नौशाद शेख, निलेश किटे, वंदना भुते, इंदू तलमले, रवींद्र गोसावी,राधा चावरे,रंजना पट्टेवार, कैलास राखडे, गुंजन मिसाळ, आशिष वैद्य, शैलेंद्र झाडे, शुभांगी कोलते, प्रतिभा बुरले, श्रेया देशमुख, प्रदीप ठाकरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका