शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

दौऱ्याच्या नावावर कर्मचारी गैरहजर

By admin | Updated: April 26, 2017 00:24 IST

येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सतत दौऱ्याच्या नावाखाली गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहे.

शेतकऱ्यांचे कृषी अधीक्षकांना निवेदन : कृषी कार्यालयातील प्रकार आष्टी (शहीद): येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सतत दौऱ्याच्या नावाखाली गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहे. सुट्या नसताना एवढे कर्मचारी कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे. येथील तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी हे दोन्ही पद गत वर्षभरापासून रिक्त आहे. सद्या दोन्ही पदांचा कारभार कृषी पर्यवेक्षक प्रमोद पेठकर पाहत आहे. त्यांना मिटींग व आढावा सभा यासाठी वारंवार वर्धा, नागपूर येथे जावे लागत असल्याने कार्यालय वाऱ्यावर राहते. कर्मचारी व कृषी सहाय्यक ही मंडळी याच संधीचा फायदा घेत गायब होतात. कार्यालयात शेतकरी आल्यावर त्यांना कर्मचारी व अधिकारी नसल्याने परत जावे लागते. महिनाभरावर खरीप हंगाम येवून पडला आहे. त्यामुळे शेतकरी विविध समस्या घेवून तालुकास्थळी येतात त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृषी विभागाला वेळ नाही असे चित्र दिसत आहे. आष्टी तालुक्यात मागील काही वर्षाआधी शेताच्या बांधावर झालेली कामे पावसाने वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचतात, बंधारा फुटल्यामुळे साहुर, माणीकवाडा, तारासावंगा मौजात जमीन पडीत राहत आहे. याप्रकरणी परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या, तरी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. खडकी, भारसवाडा, चिस्तुर या मौजातील शेतकऱ्यांनी शेतीच्या केलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखविल्या जात आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आष्टी तालुक्याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. नियमित तालुका कृषी अधिकारी असल्यास कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा शेतकऱ्याची आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी) आष्टी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने सतत खाली राहते. याप्रकरणी सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागणार व कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविणार. -अरुण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी, आष्टी (श)