शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या जागा यंदाही रिक्तच प्रवेशाचे निकष बदलले

By admin | Updated: May 11, 2014 00:30 IST

अभियांत्रिकीच्या प्रवेश पात्रतेचे निकष बदलण्यात आले असल्याने याचा परिणाम महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रवेशावर होणार आहे.

गुणांची टक्केवारी वाढली

वर्धा : अभियांत्रिकीच्या प्रवेश पात्रतेचे निकष बदलण्यात आले असल्याने याचा परिणाम महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रवेशावर होणार आहे. पीसीएम गटात ४५ टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांलाही अभियांत्रिकीकरिता प्रवेश दिला जात होता; मात्र राज्य शासनाने यात पुन्हा बदल करून जूनाच ५० टक्क्यांचा पात्रता निकष पुन्हा लागू केला आहे. परिणामी पूर्वीच रिक्त जागांची काळजी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांवर या निर्णयाने काळजीत अधिक भरच पडली आहे. याबाबत वृत्त असे की, बारावी विज्ञान शाखेतील अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांकरिता तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांनी पात्रता निकष तयार केले आहे. यानुसार प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. यासोबत भौतिकशास्त्र, गणित अनिवार्य विषय व त्याबरोबर रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, व्होकेशनल यापैकी एक विषय असे तीन विषयाचे एकत्रित गुण असे किमान ५० टक्के प्राप्त करणे अनिवार्य होते. मागासवर्गीय व अपंग उमेदवारांसाठी हाच निकष ४५ टक्के होता; मात्र गत काही वर्षांपासून अभियांत्रिकीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. प्रवेशासंबंधी अडचणींवर विचार करून पात्रतेचे निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी पीसीएम गटात ४५ टक्के गुणांवर अभियांत्रिकीत प्रवेश दिला जात होता. मागासवर्गीयांकरिता ही टक्केवारी ४० वर आली होती. यात पुन्हा ५ टक्क्याने वाढ केली असल्याने जूनाच निकष राज्यात लागू झाला आहे. या सत्रातील इयत्ता बारावी उत्तीर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेत पीसीएम ग्रुपमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य होणार आहे. या टक्केवारीतील फरकाचा परिणाम रिक्त जागांवर होणार असल्याचे दिसून येते. कारण ४५ टक्के हा पात्रता निकष असतानाही अभियांत्रिकी महाविद्यालयातील जागा रिक्त असायच्या. आता तर निकष वाढविल्याने विद्यार्थ्यांचा तुटवडा जाणवणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांची पाठ अभियांत्रिकीकडे वळणार्‍या विद्यार्थ्यांचा ओघ काही अंशी कमी झाला. महाविद्यालयातील रिक्त जागा हा त्याचाच दाखला आहे. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना पूर्वी हमखास रोजगार मिळत होता; मात्र औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे रोजगार कमी झाला. शिवाय महाविद्यालयांची संख्या वाढल्याने हा परिणाम जाणवतो.