शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

मोर्चातून कर्मचाऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

कामगार व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सदर आंदोलनादरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. सदर मोर्चात शासकीय-निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, महसूल, आरोग्य आदी विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देअंशदायी बंद करीत जुनी पेंशन योजना लागू करा : शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी रेटली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय विभागांमधील खासगीकरण थांबविण्यात यावे. तसेच जुनी पेंशन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी विविध कामगार व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सदर आंदोलनादरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. सदर मोर्चात शासकीय-निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, महसूल, आरोग्य आदी विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी. वेतन त्रुटींचे तातडीने निवारण करण्यात यावे. बक्षिस समिती खंड २ प्रसिद्ध करण्यात यावा. सर्व रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्यात यावे. सेवानिवृत्तांचे वय ६० करीत पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा. महिला कर्मचाºयांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा देण्यात यावी. सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला शासकीय सेवेत घेण्यात यावे. शासकीय विभागांचे खासगीकरण बंद करण्यात यावे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे.शिक्षण क्षेत्रातील विना अनुदान धोरण धोरण रद्द करण्यात यावे. शिक्षक, महसूल, कंत्राटी कामगार, आरोग्य विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका आदी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या तातडीने निकाली काढण्यात याव्या आदी मागण्या या देशव्यापी संप आणि मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्त्व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे हरिषचंद्र लोखंडे, विनोद भालतडक, ओंकार धावडे, बाळासाहेब भोयर, संजय मानेकर, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू)चे यशवंत झाडे, प्रदीप दाते, शिक्षक संघटनेचे अजय भोयर, दिलीप उटाणे यांनी केले.मोर्चात मोठ्या संख्येने विविध विभागातील शासकीय-निमशासकीय तसेच कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.केंद्राच्या धोरणांचा नोंदविला निषेधकामगारांचा मोर्चा : उपविभागीय महसूल अधिकाºयांना दिले निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण राबवून त्यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप करून कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ बुधवारी शहरातून मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा उपविभागीय महसूल कार्यालयात परिसरात येताच एसडीओ चंद्रभान खंडाईत यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्त्व कामगार नेते अ‍ॅड. सुधीर कोठारी, इंटकचे महासचिव आफताब खान यांनी केले. कामगारांच्या मागण्या तातडीने निकाली काढा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.इंटकच्या कार्यालय परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. मोर्चात शिक्षक संघटना, बँक असोसिएशन व विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विठोबा चौक, मोहता चौक, कारंजा चौक मार्गक्रमण करून मोर्चाने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर आंदोलनकत्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर केले. निवेदन देताना अ‍ॅड. सुधीर कोठारी, आफताब खान, प्रवीण चौधरी, राजू दीक्षित, नाना हेडाऊ, वहिद खान, डेकाटे, विलास ढोबळे, रवी गोडसेलवार, दीपक फरदे, एकनाथ डेकाटे, विलास बोडे, गजू डोंगरे, दिगंबर नवघरे, बंडू काटवले, प्रभाकर देवतळे, संतोष माथनकर, जीवन दलाल, दिलीप, गजू धात्रक आदींची उपस्थिती होती.मोर्चा एसडीओ कार्यालय परिसरात पोलिसांनी थांबविल्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. यावेळी विविध मान्यवरांसह कामगार नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. सदर आंदोलनात गिरणी कामगारही सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा