शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांपासून वीज, पाणी बंद

By admin | Updated: July 9, 2015 02:11 IST

नजीकच्या वाघोली येथील सार्वजनिक विहिरीत गाळ साचल्याने पाण्याची पातळी संपुष्टात आली.

वाघोलीच्या ग्रामस्थांची व्यथा : सार्वजनिक विहिरीत गाळच गाळ, पाणी आटलेआष्टी (शहीद) : नजीकच्या वाघोली येथील सार्वजनिक विहिरीत गाळ साचल्याने पाण्याची पातळी संपुष्टात आली. विद्युत वितरण कंपनीने तुटलेल्या तारा दुरूस्त केल्या नाही. यामुळे विजेअभावी गावात काळोख पसरला आहे. गत १५ दिवसांपासून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. अखेर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक व वीज कंपनीचा निषेध नोंदविला. ग्रामस्थांनी रिक्त भांडे दाखवून निषेध नोंदविल्याने प्रशासनात खळबळ माजली.पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात मुबलक पाणीसाठा आहे. ग्रा.पं. च्या सार्वजनिक विहिरीत गाळ साचल्याने पाण्याचे झरे बंद झाले. या विहिरीवरून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होतो. गाळ काढण्यासाठी ग्रामसेवकाला वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले. यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. या विहिरीवर जोडण्यात आलेला वीज पुरवठा बंद झाल्याची माहिती वीज कंपनीचे अंतोरा कार्यालयाचे अभियंता एम.एम. पेठे यांना दिली; पण पेठे यांनी दुरूस्त करण्याचे आश्वासन देऊन १४ दिवसांपासून वीज सुरू केली नाही. ग्रामस्थांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. आजपर्यंत वाघोली गावात अशा समस्या उद्भवल्या नाही; पण ग्रामसेवक पठाण यांच्या ढीसाळ कारभारामुळे ही स्थिती झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याविरूद्ध देवानंद डमके, ज्ञानेश्वर गवळी, प्रवीण अलोणे, पंकज लव्हाळे, अभिजीत खैरकार, रमेश ढवळे, श्रीधर वानखडे, सुरज लव्हाळे, प्रीतम सरोदे यांनी आरोग्यसेविका शारदा शिरसाट यांना गावात बोलवून पाण्याचे नमुने घेण्यास सांगितले. यात गाळ असल्यानेच दूषित पाणी असल्याचा अहवाल त्यांनी दिला. पाणी पुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांनी हातपंपावरून पाणी भरणे सुरू केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)संतप्त ग्रामस्थांकडून निषेध; ग्रामसेवकावर कारवाईची मागणीगत १५ दिवसांपासून वीज आणि पाणी पुरवठा बंद असल्याने संतप्त ग्रामस्थांनी रिक्त भांडे घेऊन निषेध नोंदविला. यावेळी दोषी ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी लावून धरली. वीज व पाणी नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.वाघोली ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत कर्मचारी केशव राऊत यांच्याकडे तक्रार केली असता तेही सतत दुर्लक्ष करीत आहेत. या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनातून दिला. यावर पंचायत समिती प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उन्हाळ्यात गाळ काढला नाहीविहिरीमध्ये गाळ असल्याची माहिती ग्रा.प. सदस्यांनी सचिव पठाण यांना दिली होती. असे असताना गाळ काढण्यासाठी सुरूवात केली नाही. सरपंचांनी ग्रामसेवक पठाण यांची बदली करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक नितीन साव यांची आॅर्डर काढली; पण ग्रामसेवक पठाण यांनी अद्याप पदभार दिला नाही. यामुळे कामकाज चालविणे कठीण झाले आहे.हातपंपालाही अपुरे पाणीसार्वजनिक विहिरीमधील झरे बुजले व पाणी आटल्याने पाणी पुरवठा बंद झाला. यामुळे ग्रामस्थांनी हातपंपावरून पाणी भरणे सुरू केले; पण हातपंपालाही पुरेसे पाणी नसल्याने गोची झाली आहे. शिवाय गर्दी होत असल्याने महिलाही त्रस्त आहेत.ग्रामसेवक पठाण काम करीत नाही. यामुळे दुसरे ग्रामसेवक देण्याची मागणी सरपंचांनी केली होती. १ जुलै रोजी ग्रामसेवक नितीन साव यांची आॅर्डर काढली आहे. पाणी पुरवठा बंद असल्याबाबत चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल.- अनिल गावंडे, गटविकास अधिकारी, पं.स. आष्टी (श.).विजेच्या तारा तुटलेल्याचवादळ व पावसामुळे विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्रामसेवकाने वीज कंपनीकडे तक्रार केली नाही. अखेर ग्रामस्थांनी तक्रार केली. यावर वीज कंपनीचे अभियंता पेठे यांनी दुरूस्तीचे आश्वासन दिले होते; पण अद्यापही दुरूस्ती करण्यात आलेली नाही. ग्रामस्थ चकरा मारतात; पण वीज कंपनीचे अधिकारी कारवाई करीत नसल्याने तेही हतबल झाले आहे.