शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

तारावर हूक टाकून सर्रास केली जातेय विजेची चोरी

By admin | Updated: January 4, 2015 23:17 IST

शासकीय जागेवर अतिक्रमण करून एकाने घर बांधले़ वीज जोडणी घेऊन शेजाऱ्यांनाही भाडे तत्वावर वीज पुरविली़ शिवाय एका वॉर्डात काही घरी नावापुरते मीटर घेऊन तारावर हुक

तळेगाव (श्या़पं़) : शासकीय जागेवर अतिक्रमण करून एकाने घर बांधले़ वीज जोडणी घेऊन शेजाऱ्यांनाही भाडे तत्वावर वीज पुरविली़ शिवाय एका वॉर्डात काही घरी नावापुरते मीटर घेऊन तारावर हुक टाकून वीज घेण्याचा गोरखधंदा जोरात सुरू आहे़ विद्युत वितरण कंपनी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ काही वर्षांपासून ग्रामपंचायत, वनविभाग, राजस्व विभागाच्या जागेवर अतिक्रमण सातत्याने वाढत आहे. या शासकीय जागांवर वीज व नळजोडणी घेण्यासाठी संबंधित विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचे असते; पण या शासकीय जमिनीवर कुठलीही परवानगी न घेता अतिक्रमण करून घर बांधण्यात आले़ शिवाय विद्युत जोडणीही घेतली़ असाच प्रकार आर्वी रोडवरील वॉर्ड नं. ६ च्या काही भागात घडत आहे़ येथे थेट घरावरून गेलेल्या तारावर हुक टाकून वीज पुरवठा घेतला जातो़ यात वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे़ वीज वितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते़ वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना याचा भुुर्दंड सोसावा लागत असल्याचे दिसते़ शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय वीज पुरवठा घेणे कायद्याने गुन्हा आहे़ शिवाय इतरांना भाडे तत्वावर वीज पुरविणेही गुन्हा आहे; पण हा व्यवसाय गावात सर्रास सुरू आहे़ अनेक वीज ग्राहकांनी शासकीय जागा बळकावून घर बांधले असून दुकाने थाटली आहेत़ या अतिक्रमणधारकांना ना-हरकत प्रमाणपत्र देता येत नाही; पण येथे वीज जोडणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे़ ग्रा़पं़ च्या हद्दीतील अतिक्रमणात अतोनात वाढ झाली आहे़ या अतिक्रमीत घरांना ग्रा़पं़ प्रशासनाने चिरीमिरी घेऊन तसेच ग्रा.प. सदस्यांनी मतदार लक्षात घेऊन बेकायदा ना-हरकत दिल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे़ काहींनी तर ग्रा.पं. सदस्य व पुढाऱ्यांना हाताशी घेऊन वीज खांबावरून थेट आकोडा टाकून वीज पुरवठा घेतल्याचे निदर्शनास आले़ या वीज चोरीचा फटका सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसते़ महावितरणने या वीज चोरीकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे़(वार्ताहर)