शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा बाजार समितीची निवडणूक

By admin | Updated: July 1, 2016 02:10 IST

येथील बाजार समितीच्या सभापतीपदाचा शरद देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदाकरिता शुक्रवारी दुपारी १ वाजता निवडणूक होऊ घातली आहे.

सभापतीपद सुरेश देशमुख गटालाच?वर्धा : येथील बाजार समितीच्या सभापतीपदाचा शरद देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदाकरिता शुक्रवारी दुपारी १ वाजता निवडणूक होऊ घातली आहे. बाजार समितीच्या सभापती पदावर आतापर्यंत देशमुख गटाचा सदस्य राहत आला असून तीच परंपरा कायम राहणार असल्याची माहिती आतील गोटातील आहे; मात्र सभापतीपदी कोणाची वर्णी लागेल याचे नाव सहकार गटाचे नेते माजी आमादार प्रा. सुरेश देशमुख निवडणुकीच्या एक तासापुर्वी जाहीर करणार असल्याची माहिती आहे. बाजार समितीत आजच्या घडीला प्रा. सुरेश देशमुख व आमदार रणजीत कांबळे यांच्या गटाच्या युतीची सत्ता आहे. यात देशमुख गटाकडे सात सदस्य होते. अशात सभापती पदाचा राजीनामा व समितीतील कामकाजात अनियमिततेचा ठपका ठेवत शरद देशमुख यांचे सभासत्त्व रद्द झाल्याने त्यांच्याकडे सहाच सदस्य राहिले आहे. तर आ. कांबळे गटाकडे पाच सभासद आहे. या व्यतिरिक्त अपक्ष असलेले दोन सदस्यही सत्ताधारी गटाशी हातमिळवणी करून आहे. बाजार समितीत भाजपाकडे तीन सभासद आहे. यामुळे येथे कोणती मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. देशमुख आणि आ. कांबळे गटाच्या युतीत असलेल्या ११ सभासदाचा आकडाच नवा सभापती निवडणार आहे. असे असले तरी सभापती पदाच्या उमेदवाराच्या नावाबबातचे गुढ अद्याप कायम आहे. सभापतीपद देशमुख गटाला जाणार असल्याने सहा सदस्यांपैकी ज्या नावावर सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख बोट ठेवतील तो सभापती होईल, हे निश्चित. असे असले तरी सभापती पदाकरिता ज्येष्ठ सभासद श्याम कार्लेकर व रमेश खंडागळे या दोन नावाची चर्चा असल्याची माहिती आतल्या गोटाने दिली. सभापती पद जरी देशमुख गटाकडे गेले तरी उपसभापती पद कांबळे गटाकडे कायम राहणार आहे. सभापती पदाचा उमेदवार निवडणुकीच्या एक तासापूर्वी जाहीर होणार असल्याने सर्वांचे लक्ष प्रा. सुरेश देशमुख यांच्या निर्णयाकडे लागले आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता समितीच्या सभागृहात ही निवडणूक होणार आहे. यात सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)