शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील बेलोरावासियांचे सामूहिक लक्ष्मीपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 10:32 IST

आष्टी शहीद तालुक्यातल्या बेलोरा (बुजरुक) येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या तरुणांनी एक गाव एक लक्ष्मीपूजन अशी नवी संकल्पना मांडली.

ठळक मुद्देगुरुदेव मंडळाचा उपक्रम प्रदूषण निर्मूलन व पर्यावरण रक्षणासाठी गावात एकमतएक गाव एक लक्ष्मीपूजनधार्मिक एकोप्यात वृद्धी

आॅनलाईन लोकमतवर्धा: केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ही उक्ती सार्थ ठरवित आष्टी शहीद तालुक्यातल्या बेलोरा (बुजरुक) येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या तरुणांनी एक गाव एक लक्ष्मीपूजन अशी नवी संकल्पना मांडली. येथे गावकºयांनी एकत्र येत लक्ष्मीपूजन केले. या एकत्रित लक्ष्मीपूजनातुन धार्मिक व सामाजिक सलोखा वाढीस लागला आहे.गत दोन वर्षांपासून बेलोरा (बुजरुक) गावात दिपावलीच्या शुभपर्वावर जय गुरुदेव लक्ष्मी मंडळ व सर्व गावकरी मिळून गावात लक्ष्मी मातेची स्थापना करतात. दहा दिवस गुरुदेव नगरीत भजन, कीर्तन, समाजप्रबोधन व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही तसाच उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मंडळाच्या युवकांनी एका मंडपात पर्यावरण रक्षणाकरिता पूर्णपणे नैसर्गिक साहित्याचा वापर करून मंडप तयार केला. ग्रामीण भागातील संस्कृती जोपासण्याचा यातून प्रयत्न केल्याचेही मंडळाच्यावतीने सांगण्यात येते.धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर गावात लक्ष्मी मातेची स्थापना करण्यात आली. यांनतर पडोळे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यानंतर प्रबोधनकार सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्तखंजेरीवादक रामपाल महाराज यांचा पंचरंगी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. लक्ष्मी पूजनानंतर भजन, कीर्तन तसेच विविध सामाजिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. गावातील वाद-विवाद, जात-धर्म, राजकारण या सर्व बाबी बाजुला ठेवत सर्व गावकरी एकत्र आले आहे. एक वेगळेच वातावरण बेलोरा गावात तयार झाले आहे. जय गुरुदेव लक्ष्मी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मी माता मंडप तुराट्या, बांबु, माती लाकडाच्या पाट्यापासून तयार केला. यामध्ये जाते, चुल, सुप, पारडी, तांबा ,पितळची भांडी, मातीची मडकी, कंदील, चिमणीचा खोपा तयार करुन संस्कृतीचेही दर्शन घडविले आहे.गावात धार्मिक एकोप्यात वृद्धीच्शासनाच्यावतीने एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे. हीच संकल्पना मनात घेऊन तालुक्यातील बेलोरा येथील नागरिकांनी दिवाळी सारख्या सणात एक गाव एक लक्ष्मीपूजन ही संकल्पना अंमलात आणली. फटाक्यामुळे होणाºया प्रदूषणालाही आळा बसला शिवाय गावात धार्मिक एकोप्यात वृद्धी झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :diwaliदिवाळी