शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांपासून शिक्षक वेतनापासून वंचित

By admin | Updated: March 14, 2015 02:02 IST

सरस्वती माता विद्या प्रसारक मंडळ ठाणेगावद्वारा संचालित नवप्रभात विद्यामंदिर ठाणेगाव येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१४ पासून मासिक वेतन देण्यात आले नाही.

कारंजा (घा़) : सरस्वती माता विद्या प्रसारक मंडळ ठाणेगावद्वारा संचालित नवप्रभात विद्यामंदिर ठाणेगाव येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१४ पासून मासिक वेतन देण्यात आले नाही. महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन मिळावे, असा दंडक असताना शिक्षण विभागाचे दुर्लक्ष व अनागोंदी कारभारामुळे शिक्षकांना मनस्ताप होत आहे़ यामुळे दैनंदिन व्यवहार व उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न शिक्षकांपुढे उभा ठाकला आहे़सरस्वती माता विद्या प्रसारक मंडळ या संस्थेच्या दोन संचालक गटात अनेक वर्षांपासून अनेक भांडणे सुरू आहेत. काही दावे कोर्टात सुरू आहेत़ एका गटाच्या आहारी जाऊन शिक्षणाधिकारी (माध्य़) जि.प. वर्धा यांनी याच संस्थेच्या सावळी शाळेतून घसाड यांची नवप्रभात विद्यामंदिर ठाणेगाव येथे ज्येष्ठता क्रम डावलून नियमबाह्य मुख्याध्यापक पदी बदली केली. मान्यताही प्रदान केली; पण या आदेशावर दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला. यानंतर आदेशाला स्थगिती देण्यात आली, तेव्हापासून या शाळेला अधिकृत मुख्याध्यापक नाही. यामुळे पवित्र शिक्षण कार्य करणाऱ्या शिक्षकांना सप्टेंबर २०१४ पासून मासिक वेतन मिळाले नाही.शिक्षण विभागाने वेतन बिलावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार नसणाऱ्या मुख्याध्यापकांच्या (घसाड) स्वाक्षरीने हायस्कूलच्या शिक्षकांचे सप्टेंबर ते डिसेंबर २०१४ पर्यंतचे वेतन बिले स्वीकारली व मंजूर केली; पण त्याच शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाची वेतन बिले मात्र स्वीकारली नाही़ यामुळे ते वेतनापासून अद्याप वंचित आहे. मुख्यमंत्री व शिक्षण उपसंचालकांनी संस्थेच्या शेड्युल वनप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे़ याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)संस्थेतील सेवाज्येष्ठता यादीतील सेवाज्येष्ठ शिक्षकांना स्वाक्षरी करण्याचे अधिकार देऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, अशा शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्पष्ट सूचना आहे; पण शिक्षणाधिकारी समस्या सरळमार्गी निकाली काढण्यास तयार नसल्याने वेतनाचा प्रश्न निर्माण झाला़ यामुळे शिक्षक न्यायासाठी आंदोलन करण्याचा तयारीत आहेत़