शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

दोन रेती घाट धारकांना आठ लाखांचा दंड

By admin | Updated: April 1, 2015 01:52 IST

स्मॅट प्रणालीनुसार जिल्ह्यात १५ घाटांतून रेतीचा उपसा होत आहे़ असे असले तरी प्रत्यक्षात किती घाट सुरू आहे, ...

वर्धा : स्मॅट प्रणालीनुसार जिल्ह्यात १५ घाटांतून रेतीचा उपसा होत आहे़ असे असले तरी प्रत्यक्षात किती घाट सुरू आहे, हे निरीक्षणानंतरच समोर येणार आहे़ यात अनेक घाटांवर नियमांना बगल देत रेतीचा अतिरेकी उपसा केला जात आहे़ अशाच दोन घाटांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर आणखी एका घाटावर कारवाई होणार असल्याचे खनिकर्म विभागाद्वारे सांगण्यात आले आहे़ खनिकर्म विभागाच्यावतीने काही घाटांची तपासणी करण्यात आली होती़ यात आपटी रेती घाटामधून अधिक उत्खनन केल्याचे निदर्शनास आले. या घाटधारकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी बढे यांनी सांगितले़ शिवाय सायखेडा घाटाचेही खनिकर्म अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले होते़ या प्रकरणातही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या घाटातून ९८ ब्रास रेतीचा अतिरिक्त उपसा करण्यात आल्याचे निरीक्षणात निदर्शनास आले़ या घाटधारकाकडून ५ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केल्याचेही सांगण्यात आले़ घाटधारकांना हिशेब सादर करावा लागतो़ यानंतर अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यास ते मोजमाप करतात़ यानुसारच निरीक्षणादरम्यान केलेल्या मोजमापात अतिरिक्त रेती उपसा झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर सायखेडा येथील रेती घाटावर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील अन्य घाटांतही असाच प्रकार सुरू असून रेतीचा अतिरेकी व यंत्रांद्वारे उपसा केला जात आहे़ सर्व घाटांचे निरीक्षण गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)