शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत - न्यायमूर्ती भूषण गवई 

By चैतन्य जोशी | Updated: February 17, 2024 21:01 IST

हिंगणघाट येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात ३० कोटी ३० लाख रुपये खर्च करून सर्व सुविधायुक्त बांधण्यात येणाऱ्या हिंगणघाट जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन व कोनशीला सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.

हिंगणघाट : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून राजकीय समानतेसोबत सामाजिक समानतेचे अधिकार दिलेले आहेत. घटनेतील कलमानुसार सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्यासाठी न्यायालयांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

हिंगणघाट येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात ३० कोटी ३० लाख रुपये खर्च करून सर्व सुविधायुक्त बांधण्यात येणाऱ्या हिंगणघाट जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन व कोनशीला सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन वा. सांबरे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा वर्ध्याच्या पालक न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष तथा पालक सदस्य ॲड. पारिजात पांडे, ॲड. आशिष देशमुख, आसिफ कुरेशी, अनिल गोवरदिपे, मोतीसिंग मोहता, हिंगणघाट वकील संघाचे अध्यक्ष राजेश बोंडे आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती गवई पुढे म्हणाले की, महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील या हिंगणघाट येथील नव्याने उत्कृष्ट अशा बांधण्यात येणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतून सर्वसामान्यांना व पिढ्यानपिढ्या वंचित राहिलेल्या घटकांना न्याय देण्याचे काम न्यायालयातून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी वेळात कसा न्याय देता येईल, याकडे लक्ष द्यावे, असे न्यायमूर्ती गवई यांनी सांगितले.न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी सांस्कृतिक व औद्योगिक क्षेत्राचा वारसा लाभलेल्या हिंगणघाट येथील न्यायालयातून सर्वसामान्यांना न्याय देण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे शासन सर्वसामान्यांना देत असलेल्या सुविधांचा पूर्ण वापर होण्यासाठी न्यायालयांनी आपले कर्तव्य पार पाडावे, असे सांगितले.

नव्याने बांधण्यात येणाऱ्या न्यायालयाच्या इमारतीतून काम करताना वकिलांनी आपल्या ज्येष्ठ विधिज्ञाचा आदर सन्मान राखावा व नवीन इमारतीची प्रतिमा उंचवावी, असे न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर म्हणाल्या. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचा केंद्रबिंदू असलेल्या हिंगणघाट येथे नव्याने होणाऱ्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीतून सामाजिक व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे, असे न्यायाधीश संजय भारुका यांनी सांगितले.यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी नवीन इमारत बांधण्यात येणाऱ्या जागेवर कुदळ मारून भूमिपूजन केले. प्रास्ताविक राजेश बोंडे यांनी केले. यावेळी विविध न्यायमूर्तींचा सत्कार करण्यात आला. सोहळ्याला नागपूर, वर्धा, अकोला येथील न्यायाधीश, बार कौन्सिल संघटनेचे पदाधिकारी, न्यायाधीश, वकील मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Courtन्यायालय