शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कुशल हातांअभावी यंत्रणा कुचकामी

By admin | Updated: May 8, 2015 01:47 IST

जिल्हा प्रशासनाची आपत्ती निवारण यंत्रणा साहित्यानिशी सुसज्ज असली तरी प्रशिक्षणाचा अभाव आहे.

श्रेया केने वर्धाजिल्हा प्रशासनाची आपत्ती निवारण यंत्रणा साहित्यानिशी सुसज्ज असली तरी प्रशिक्षणाचा अभाव आहे. नियमानुसार किमान प्रत्येक सहा महिन्यांमध्ये आपत्ती निवारण पथकाचे सराव पथसंचलन होणे गरजेचे असते; मात्र जिल्हा प्रशासनाकडून गत दीड वर्षात प्रात्याक्षिक अथवा सराव करून झाला नाही. त्यामुळे आपत्तीकाळात काम करणाऱ्या यंत्रणा या उपलब्ध साधनांचा वापर कशा पद्धतीने करणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. जिल्हा आपत्ती निवारण समितीचे प्रशिक्षण, सरावाबाबत असलेली उदासिनता याला कारणीभूत ठरत आहेत.जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त जिल्हास्तरावर असलेल्या आपत्ती निवारण यंत्रणेचा आढावा घेतला असता ‘सरावाचा अभाव’ ही बाब प्रकर्षाने पुढे आली. रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक चळवळ आहे. या माध्यमातून जागृती करणे, नैसर्गिक अथवा अन्य आपत्तीच्या काळात मदत व बचाव कार्यात शासकीय यंत्रणेला मदत करणे याकरिता कार्य करते. या दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या आपत्ती निवारण कक्ष असून जिल्ह्यात साधनांची उपलब्धता आहे. मात्र प्रशिक्षणाचा अभाव आहे. आपत्ती काळात नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेला शासकीय उदासिनतेचा सामना करावा लागत आहे. सराव, प्रशिक्षण घेण्याबाबत शासकीय अधिकारी जागरूक नसल्याचे दिसते. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास नागरिकांनी बचाव पथकाकडे मदत मागितल्यास बचाव पथक कितपत कार्य करू शकेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.जागतिक रेडक्रॉस दिन : जिल्हास्तरावर आपत्ती निवारण कक्ष आपत्तीच्या काळात मदत कार्य अथवा बचाव कार्यासाठी शासकीय यंत्रणा असते. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षामार्फत त्याचे संचलन केले जाते. यात आरोग्य प्रशासन, पोलीस प्रशासन, गृहरक्षक दल यांचा प्रामुख्याने समावेश असतो. जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीच्या स्थितीत ही यंत्रणा कार्य करते. केंद्र व राज्य शासनाकडून यंत्रणेला निधी देण्यात येतो. जिल्ह्यातील आपत्ती निवारण कक्षाकडे साधनांची मुबलकता आहे. शिवाय निधी असल्याने आवश्यक साधनांची खरेदी करण्यात आली. या साधनांचा वापराचे प्रशिक्षण दिले नसल्याने ते निरुपयोगी आहे.बचाव कार्यात गृहरक्षक दल, पोलीस प्रशासन यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. जिल्ह्याच्या आपत्ती निवारणाची मुख्य जबाबदारी गृहरक्षक दलाकडून पार पाडली जाते. गत दोन वर्षात १० बचाव कार्य या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केले.प्रशिक्षणाचा अभावबचाव यंत्रणेला प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्येक दोन महिन्यांनी नाही तर किमान सहा महिन्यांत एकदा सराव करून घेणे आवश्यक असते. मात्र जिल्हास्तरावर अशी कोणतीच कार्यवाही केली जात नाही. २०१३-१४ मध्ये दिलेल्या प्रशिक्षणानंतर सराव, मॉकड्रिल करून घेण्यात आली नसल्याची माहिती आहे. आपत्तीचे स्वरूपही बदलत असून साधनांमध्येही आधुनिकता आली आहे. याकरिता पथकाला याची माहिती, सराव असणे आवश्यक आहे. अन्यथा बचाव कार्यात मोठा अडसर निर्माण होवू शकतो.आपत्तीच्या काळात आरोग्य यंत्रणेचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. जिल्हा रूग्णालय, तालुकास्तर व ग्रामीण भागात आपत्ती काळात कार्य करण्यासाठी एक पथक असते. भूकंप, पूर अशा आपत्तीत साथ रोगाची भीती असते. त्यामुळे यावर नियंत्रण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.रेडक्रॉस या संस्थेचे असलेले अधिकचे चिन्ह पूर्वी डॉक्टरांकडून वापरण्यात येत होते; मात्र आयएमए व अधिकृत संस्थांनी या चिन्हाला आरोग्य यंत्रणेचे बोधचिन्ह म्हणून बाद ठरविले आहे.रेड क्रॉसच्या माध्यमातून देशस्तरावर अनेक जागृतीचे उपक्रम पार पाडले जातात. शासकीय यंत्रणेला उपक्रमात सहकार्य केले जाते. जिल्हास्तरावर रेडक्रॉस संघटना सक्रीय नाही.जागतिक रेडक्रॉस दिन हा डॉ. हॅनी ड्यूनंत यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. त्यांनी या संघटनेची स्थापना करून आंतरराष्ट्रीय स्तरावर चळवळीत रूपांतर केले. ही सामाजिक संघटना एक चळवळ झाली असून या माध्यमातून आपत्ती काळात मदत व बचाव कार्यात सहकार्य करण्यात येते.