शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत ईएसआयसी कार्यालयासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:40 IST

राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. १४ ईस्पितळे व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. राज्यात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू असून यात वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे; .......

ठळक मुद्दे रामदास तडस : जिल्हास्तरीय कामगार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. १४ ईस्पितळे व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. राज्यात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू असून यात वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे; पण वर्धा जिल्ह्यात कार्यालय व दवाखाना नसल्यामुळे जिल्ह्यातील कामगारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. सदर कार्यालय व दवाखाना वर्धेत व्हावा यासाठी आ. पंकज भोयर व आपण स्वत: प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.भारतीय जनता कामगार महासंघ व लॉयडस् ईस्पात मजदूर संघाच्यावतीने आयोजित कामगार मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर आ. डॉ. पंकज भोयर, जि. प. सदस्य पंकज सायंकार, कामगार नेते मिलिंद देशपांडे, राजहंस राऊत, कर्मचारी विमा योजनेचे मनोज यादव, डॉ. एस. आर. हसन आदींची उपस्थीत होती. खा. तडस पुढे म्हणाले, जिल्ह्यात ३,५०० कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ई. एस. आय. सी. च्या सुविधा मिळण्यास अडचण जाऊ नये याकरिता वर्धेत कार्यालय व दवाखाना सुरु करण्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर व आपण स्वत: सरकारकडे पाठपुरावा करु. ई. एस. आय. सी. संदर्भात उद्धभवणाऱ्या अडचणीबाबत लवकरच बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. आ. डॉ. पंकज भोयर यांनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र सरकारकडे वर्धेत कार्यालय सुरु करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. शिवाय कामगार मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर अधिवेशात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी मनोज यादव, जि.प.सदस्य पंकज सायंकार, राजहंस राऊत यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मिलिंद देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अभय नागरे यांनी केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसPankaj Bhoyarपंकज भोयर