शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणप्रणाली एकांगी नव्हे तर सर्वांगीण व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:22 IST

शिक्षण संबंधित वर्तमानात काही आव्हाने आहेत. याबाबत लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. शिक्षणातील महत्त्वपूर्ण मुद्यांवर विचार होण्याची गरज आहे.

ठळक मुद्देलालटू हरजिंदर : आॅल इंडिया कौंसिलिंग आॅफ स्टुडंट्स स्ट्रगलर्सचे दुसरे सत्र

आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : शिक्षण संबंधित वर्तमानात काही आव्हाने आहेत. याबाबत लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. शिक्षणातील महत्त्वपूर्ण मुद्यांवर विचार होण्याची गरज आहे. वर्तमानातील शिक्षणनितीचा प्रामाणिकपणे व बारकाईने अभ्यास करून घातक बाबींवर चर्चा करून चालणार नाही. संकटाच्या निवारणाचा मार्ग शोधावा लागेल. स्वातंत्र्यानंतर शिक्षण व भाषांवर जनपक्षीय धोरणांची उणीव राहिली. यामुळे शिक्षण प्रक्रिया एकांगी नव्हे तर सर्वांगीण झाली पाहिजे, असे मत हैद्राबाद येथील प्रा. लालटू हरजिंदर यांनी व्यक्त केले.नई तालीम समिती परिसरातील शांती भवनमध्ये तीन दिवसीय आॅल इंडिया कौंसिलींग आॅफ स्टुडंटस स्ट्रगलर्सचे दुसरे सत्र पार पडले. यावेळी ते बोलत होते. दिल्ली विश्व विद्यालयाचे निवृत्त प्रा.डॉ. मधु प्रसाद म्हणाले की, शिक्षणावर सर्वांचा सारखा अधिकार आहे. यावर चालणारे अभियान तीव्र व्हावे. २००९ ची शिक्षण प्रणाली जनविरोधी होती. केंद्र सरकार राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडित काढण्याच्या मार्गावर व गरीबांच्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखत आहे. शिक्षणप्रणाली नागरिकांच्या मुक्तीसाठी नाही तर गुलामीकडे नेणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.पर्यावरण तज्ज्ञ मेहेर इंजिनीयर म्हणाले की, विद्यार्थ्यांना मध्यान्ह जेवनाची व्यवस्था केली; पण ती भ्रष्टाचाराचे कुरण ठरली. शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला. स्थानिक भाषेकडे दुर्लक्ष करण्यात येत असून बाह्य भाषेचा आग्रह धरला जात आहे.म. गांधी हिंदी विद्यापीठाचे विद्यार्थी नरेश गौतम व शांती निकेतन विश्वभारती विद्यालयाचे रोहीत कुमार यांनी विद्यार्थी संघटनांची बैठक व सुरूवात बँगलोरला झाली होती. देशभरातील शिक्षणावर विचार व कार्य करणाºया युवक संघटनांमध्ये समन्वय असावा, या उद्देशाने बैठक, चर्चेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.सुमारे ६० विद्यार्थी संघटनांचे १०० प्रतिनिधी कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते.