शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण; गरिबीचे दुष्टचक्र भेदण्याचा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:22 IST

महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे सामर्थ्य ओळखून सर्वांना समान, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरला होता. संविधानानुसार शिक्षण विशेषत: उच्च शिक्षण हा आमचा हक्क आहे व तो देणे सरकारचे दायित्व आहे.

ठळक मुद्देदेविदास घोडेस्वार : राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे सामर्थ्य ओळखून सर्वांना समान, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरला होता. संविधानानुसार शिक्षण विशेषत: उच्च शिक्षण हा आमचा हक्क आहे व तो देणे सरकारचे दायित्व आहे. असे असतानादेखील बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. शिक्षण हाच गरिबीचे दुष्टचक्र भेदण्याचा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन संविधान अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार यांनी केले.घांगळे सभागृहात प्रजासत्ताक शिक्षण कर्मचारी संघातर्फे आयोजित सातव्या राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.श्रीरंग मेंढे होते. मीरा इंगोले, अरूणकुमार हर्षबोधी, वामन सोमकुवर प्रामुख्याने उपस्थित होते.संविधानातील शिक्षण व आजची आव्हाने या विषयावर बोलताना प्रा.घोडेस्वार म्हणाले, शिक्षणाला खासगीकरणाच्या विळख्यात ढकलून १३ पॉइंट आरक्षणासारखे निर्णय घेतले जात आहे. त्यामुळे शिक्षण म्हणजे नोकरीसाठी अर्ज करण्याची पात्रता, पण नोकरी मिळणार नाही, अशी प्रस्थापित व्यवस्था परिवर्तनासाठी पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.प्रा.श्रीरंग मेंढे यांनी शिक्षणाच्या वर्तमान व्यवस्थेवर टीका केली. सचिन धोंगडे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. प्रास्ताविक अरविंद माणिककुळे यांनी केले. विषयाची भूमिका डॉ. राजू कांबळे यांनी मांडली. संचालन सावित्रीबाई नाखले यांनी तर आभार भाग्यश्री भगत यांनी मानले. आयोजनासाठी प्रकाश कांबळे, किशोर ढाले, सत्येंद्र गोटे, मनोहर लांडगे, परमा तायडे, मिलिंद नगराळे, विजय भालेराव इत्यादींनी सहकार्य केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती