शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी माध्यमिक व पालकांत शाब्दिक चकमक

By admin | Updated: January 3, 2017 01:11 IST

स्थानिक जनता हायस्कूल प्रशासनाने विद्यार्थ्यांवर केलेल्या दंडात्मक कारवाईच्या विरोधात खा. रामदास तडस

रामदास तडस यांची उपस्थिती : जनता हायस्कूलच्या दंडात्मक कारवाईचा वाद देवळी : स्थानिक जनता हायस्कूल प्रशासनाने विद्यार्थ्यांवर केलेल्या दंडात्मक कारवाईच्या विरोधात खा. रामदास तडस यांच्या कार्यालयात सोमवारी आयोजित पालक सभेत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एल.एम. डुरे व पालकांत चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. यामुळे प्रकरण चिघळण्यापर्यंत आले. शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या कापसे यांच्या विरोधात पालकांनी याप्रसंगी विचित्र व्यवस्थापनाचा पाढाच वाचला. जनता हायस्कूलच्या मुुख्याध्यापिका कापसे यांनी शाळेतील ५० विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करून दोन दिवसापर्यंत वर्गाबाहेर ठेवले. पाच दिवसांपर्यंत वर्गात न बसण्याची तंबी देत प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड केल्याचा आरोप होता. मुख्याध्यापिकेच्या दडपशाहीने विद्यार्थ्यांचे नुकसान- पालकांचा आरोप ४शाळेतील पाचव्या वर्गातील विद्यार्थिनीने दोन महिन्यांपर्यंत शाळेच्या हजेरी पटावर घेतले नसल्याने व सेमी इंग्रजीमध्ये प्रवेश नाकारल्याने विष प्राशन केले. सावंगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देवून ती बचावली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या बाराव्या वर्गातील विद्यार्थिनीला बोर्डाच्या परीक्षेतून हाकलून लावले. त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांजवळ सिगारेट आढळली म्हणून त्याच्यावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. पालकांच्या अनेक विनवण्यानंतर दोन हजार रुपयात प्रकरण निपटल्याचे पालकांनी खासदार व शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जनता हायस्कूलमधील दडपशाहीचे प्रकार नेहमीचेच झाले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसोबतच पालकांना कोंडीत पकडले जात आहे. यापुढे या शाळेतील कोणताही अनुचित प्रकार सहन केला जाणार नाही. - खा. रामदास तडस शाळेतील सर्व प्रकाराची येत्या तीन दिवसात चौकशी करून याबाबतचा अहवाल संस्थेला देण्यात येईल. तसेच कारवाई करण्याचे सांगण्यात येईल. संस्थेने कारवाई न केल्यास शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रार देण्यात येईल. - एल.एम. डुरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), वर्धा.