शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ऩप़ चे शिक्षण; ११ शाळांवर १० लाखांचा खर्च

By admin | Updated: February 4, 2015 23:19 IST

खासगी संस्थांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळांना अखेरची घरघर लागली आहे़ वर्धा शहरात पालिकेच्या ११ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आणि एक हायस्कूल आहे़

प्रशांत हेलोंडे - वर्धाखासगी संस्थांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळांना अखेरची घरघर लागली आहे़ वर्धा शहरात पालिकेच्या ११ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आणि एक हायस्कूल आहे़ यातील ११ शाळांवर शासनाचे १० लाख रुपये खर्च होत आहे़ एकाही शाळेत पटसंख्या समाधानकारक नसून एका शाळेत तर केवळ १८ विद्यार्थ्यांवर ३५ हजार रुपयांचा खर्च होत आहे़वर्धा नगर परिषदेच्या शहरात ११ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत़ या शाळांची एकूण पटसंख्या ७१३ असून २९ शिक्षक कार्यरत आहेत़ या शिक्षकांवर महिन्याकाठी शासनाचा १० लाख ३७ हजार २७ रुपये खर्च होत आहे़ यातील १ लाख ५४ हजार ९८९ रुपयांची कपात होऊन ८ लाख ८२ हजार ३८ रुपये निव्वळ खर्च होत असल्याची माहिती पालिकेने माहिती अधिकारात दिली. हा खर्च केवळ वेतन आणि भत्त्यांवर होणारा आहे़ शाळेच्या देखभाल, दुरूस्ती, शैक्षणिक साहित्य व अन्य विषयांवर होणारा खर्च वेगळाच. यातील काही खर्च पालिकेला मिळणाऱ्या शिक्षण करातून तर काही खर्च सर्व शिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेद्वारे केला जातो़ एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना शाळेतील गुणवत्ता सुधारत नसल्याने विद्यार्थीसंख्या कमी होत आहे़ पालिकेच्या स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेत तर केवळ १८ विद्यार्थी आहेत़ यातील इयत्ता पहिलीमध्ये तीन, इयत्ता दुसरीत तीन, तिसरीमध्ये १० तर चवथ्या वर्गामध्ये केवळ सहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ या १८ विद्यार्थ्यांसाठी २ शिक्षक कार्यरत असून त्यांच्यावर ३५ हजार ५५४ रुपये खर्च होत आहे़ सर्वाधिक १९५ ही पटसंख्या शिवाजी उच्च प्राथमिक शाळेत असून तेथे सहा शिक्षक कार्यरत आहेत़ या शाळेवर वेतनाचा खर्च १ लाख ९६ हजार ४८२ रुपये होत आहे़ २७ शिक्षक आणि २ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर एकूण १० लाख रुपयांचा खर्च होत असताना नगर परिषदांच्या शाळांतील शैक्षणिक दर्जा सुधारताना दिसत नाही़