शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता मेळावा

By admin | Updated: August 7, 2016 00:29 IST

येथील म.रा.वि.वि. कंपनीच्या लघु प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र शासनाची योजना राबविण्याकरिता सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता मेळाव्याला ...

सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता मेळावा वर्धा : येथील म.रा.वि.वि. कंपनीच्या लघु प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र शासनाची योजना राबविण्याकरिता सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता मेळाव्याला चाळीस पदवी आणि पदविकाधारक विद्युत अभियत्यांनी सहभाग नोंदविला. सदर मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून वर्धा मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस उपस्थिता होते. या योजनेचा लाभ घेवून बेरोजगार विद्युत अभियंत्यांनी स्वबळावर व्यवसाय सुरू करून इतरांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे आवाहन देशपांडे यांनी केले. सदर मेळाव्यात प्रथमत: महावितरण कंपनीतर्फे योजनेचे महत्व सांगत बेरोजगार विद्युत अभियत्यांना थेट लॉटरी पद्धतीने कामे देणार असल्याची विस्तृत माहिती देण्यात आली. प्रथम वर्षात १० लाख रूपयापर्यंत किमतीची मर्यादा असेल. त्यानंतर ४० लाख रूपये पर्यंतची कामे अशी एकूण ५० लक्ष रूपयांची कामे निश्चित केलेली आहे. दुसऱ्या वर्षी १५ लाखांपर्यंतची कामे थेट लॉटरी पध्दतीने तर वार्षिक कामे एकूण ७५ लाखांपर्यंतची कामे देण्यात येतील. सदर मेळाव्यात काम देण्याबाबतचे निकष, विद्युत अभियंता नोंदणी कार्यपद्धती, योजनेंतर्गत द्यावयाच्या कामाचा तपशिल, योजनेची कार्यपद्धती वाटपाची रूपरेषा यांचे प्रेझेंटेशन देण्यात आले. उपस्थितांच्या विविध शकांचे निरसनही यावेळी करण्यात आले. सदर कामे घेण्यासाठी विद्युत कंत्राटदार अनुज्ञाप्ती व नोंदणी करणे आवश्यक असल्याने या बाबत वर्धा जिल्ह्याचे विद्युत निरीक्षक भोयर यांनी मार्गदर्शन केले.अधिकारी चांडक यांनीही माहिती दिली. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी वर्धा आर्वी, हिंगणघाट, विभागातील कर्मचारी, अभियंते, विद्युत निरिक्षक कार्यालय वर्धा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)