शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांचे आर्थिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:38 IST

मध्य रेल्वेच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या सफाईचा तीन वर्षांचा ठेका सातारा जिल्ह्यातील प्रमोद पाटील यांना मिळाला. या अ‍ॅग्रीमेंटप्रमाणे १७ सफाई कामगार येथे नियुक्त केले.

ठळक मुद्देसिटूचे आमदारांना निवेदन : त्वरित कारवाई करण्याची मागणी

ऑनलाईन लोकमतवर्धा : मध्य रेल्वेच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या सफाईचा तीन वर्षांचा ठेका सातारा जिल्ह्यातील प्रमोद पाटील यांना मिळाला. या अ‍ॅग्रीमेंटप्रमाणे १७ सफाई कामगार येथे नियुक्त केले. मात्र या ठेकेदाराकडून कर्मचाºयांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप सिटूने आ. डॉ. पंकज भोयर यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.मध्य रेल्वेशी झालेल्या कराराप्रमाणे सर्व सफाई कामगारांना ३६० रुपये प्रती दिन वेतन देणे बंधनकारक आहे. येथे मात्र १८३ रुपये रोज सफाई कामगारांना दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वेतन कमी मिळत असल्याने कामगारांनी डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर नागपूर यांना तक्रार केली. १ फेब्रुवारी २०१८ रोजी डी.आर.एम.मध्य रेल्वे नागपूर येथे कामगार, कंत्राटदार, रेल्वे अधिकारी यांच्यात नागपूर येथे चर्चा होऊन वेतन ३६० रुपये प्रती दिन देण्याचा निर्णय झाला. मात्र कंत्राटदाराने वेतन वाढवून मागणाºया १२ सफाई कामगारांना १८३ रुपये रोजाने काम करा अन्यथा कामावरुन बंद असा सज्जड दम देऊन कामावरुन कमी केले.एवढेच नव्हे तर कामगारांना ओळखपत्र देण्याच्या नावाखाली दिवाळीत आधार कार्डाची झेरॉक्स प्रत सही करुन घेतली. या आधारकार्डाचा कंत्राटदाराने दुरुपयोग करुन इक्वीटास स्मॉल सेव्हींग बँक, कराड, जि. सातारा येथे कामगारांचे सेव्हींग बँक अकाऊंट काढले. त्या खात्यावर पासबुक, ए.टी.एम. कार्ड, चेकबुक कामगारांचे नावे उचलून त्याचा वापर कंत्राटदार करीत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. सदर खात्यात कामगारांचे दोन महिन्याचे वेतन २६ हजार ३२२ रुपये कंत्राटदाराने जमा केले व दुसºयाच दिवशी ते काढूनही घेतले.१९ फेब्रुवारी २०१८ रोजी कंत्राटदार वर्धा येथे आला असताना त्याला कामगारांनी थकीत वेतन मागितले असता, तुमचे वेतन झाले, तुम्ही पैसे उचलले देखील आहे. असे सांगून बँकेचे अकाउंटची यादी दिली. सदर यादी घेऊन वर्धा येथील ईक्विटास बँकेचे धंतोली चौकातील शाखेत जाऊन कामगारांनी बँक पासबुकाची प्रत काढली तेव्हा हा गैरप्रकार उघड झाला.सेवाग्राम रेल्वे स्थानकात सफाईकरिता असलेल्या सर्व मशिन्स बंद अवस्थेत आहेत. डस्टबीन लावले नाही, अ‍ॅग्रीमेंटप्रमाणे व्यवस्था नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.अशाप्रकारे सफाई कामगारांना कामाचे वेतनही मिळाले नाही व वेतन मागितले असता कामावरुन बंद केले व फसवणूक केली. या घटनेची तक्रार प्रत्यक्ष भेटून नागपूर येथील मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांना केली असून खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर यांना स्वत: भेटून कामगारांनी केली आहे.कामगारांना थकीत वेतन देऊन पूर्ववत कामावर घ्यावे, त्यांना नियमाप्रमाणे ३६० रुपये प्रती दिन वेतन, प्रॉव्हीडंट फंड कपात, हजेरी कार्ड, हॅन्ड ग्लोज, गमबुट, राष्ट्रीयकृत बँकेद्वारा वेतन, दिवाळी बोनस १० तारखेपर्यंत दरमहा वेतन मिळावे, अपघात विमा काढावा, बेकायदेशिरपणे कमी केलेल्या सर्व १२ कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स चे सिताराम लोहकरे, यशवंत झाडे, भैय्या देशकर, सुनील घिमे यांनी निवेदनातून केली असून कार्यवाहीची मागणी केली आहे.